Breaking news : नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताला सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:38 PM2019-04-25T16:38:14+5:302019-04-25T16:38:43+5:30
भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांची सोनरी कामगिरी.
नवी दिल्ली : नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताकडून आज सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी 10 मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी विभागात सुवर्णपदक पटकावले.
#ISSFWorldCup 2019: Manu Bhaker and Saurabh Chaudhary win gold in 10m Air Pistol Mixed team event. pic.twitter.com/JXrZjffFkz
— ANI (@ANI) April 25, 2019
मनू आणि सौरभ हे सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. ही स्पर्धा सध्या चीनमधील बीजिंग येथे सुरु आहे. पण यापूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेतही या दोघांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. मनू आणि सौरभ यांनी यजमान चीनच्या खेळाडूंच्या जोडीला अंतिम फेरीत 16-6 असे पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
मनू आणि सौरभ यांनी पात्रता फेरीमध्ये 482 गुण पटकावले होते. त्यामुळे मनू आणि सौरभ यांना पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मनूने मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले असले तरी तिला महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा अडथळाही तिला पार करता आला नव्हता. पण मिश्र दुहेरी प्रकारामध्ये मात्र मनूने सौरभबरोबर खेळताना ही कसर भरून काढली.
यापूर्वी भारताच्या अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंग पवार यांनी सुवर्णपदक पटकावले होते. भारताचे या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक होते. अंजुम आणि दिव्यांश या जोडीने चीनच्या लिऊ रुक्सुअन आणइ यांग हाओरन यांच्यावर अटीतटीच्या लढतीत 17-15 असा विजय मिळवला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.