संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करत असताना क्रीडापटूच्या घरात दुःखद घटना घडली आहे. गोल्फटपटू कॅमिलो व्हिलेगास याच्या 22 महिन्यांच्या कन्येचं नुकतंच निधन झालं. मिआ असे तिचं नाव असून तिच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यात कॅन्सरच्या गाठी झाल्या होत्या.
व्हिलेगास यानं चार वेळा PGA Tour स्पर्धा जिंकली आहे. मागील महिन्यात मुलीची प्रकृती खालावल्यामुळे त्यानं आणि त्याची पत्नी मारिया यांनी मियामीच्या निकलॉस चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. तेव्हा तिच्या मेंदू व पाठीच्या कण्यात कॅन्सरच्या गाठी असल्याचे समोर आले. त्यावेळी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु तोपर्यंत गाठ बरीच पसरली होती.
व्हिलेगासनं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ''शस्त्रक्रियेनंतर जेव्हा टाके काढण्यात आले त्यावेळी गाठ प्रचंड वाढल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा लगेच उपचार करावे लागतील असे सांगण्यात आले, त्यामुळे मुलीला हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले. पण, तिची झुंज अपयशी ठरली,''असे व्हिलेगासनं सांगितले. पण, तिची ही लढाई, मला प्रेरणा देऊन गेली, असेही तो म्हणाला.
IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?
139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक!