शारदा मंगल कार्यालय, दादर पूर्व येथे सुरु असलेल्या २३ व्या मुंबई महापौर जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत डी. के. सी. सी. च्या निरज कांबळेने दुसऱ्या फेरीत आपल्याच क्लबच्या मिहीर शेखवर २५-९, १५-२५ व २५-१६ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे बँक ऑफ इंडियाच्या दिपक मारून अंकुर स्पोर्ट्स क्लबच्या अमोल शिंदेंवर २५-९, १-२५ व २५-१३ असा चुरशीचा विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. त्यापूर्वी दुपारी ४ वाजता मुंबईच्या माजी महापौर सौ. श्रद्धा जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका सौ. उर्मिला पांचाळ, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रदिप मयेकर, मानद सरचिटणीस, श्री यतिन ठाकूर व खजिनदार श्री अरुण केदार उपस्थित होते.
पुरुष एकेरी दुसऱ्या फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे
संजय मोहिते ( विजय कॅरम क्लब ) वि वि हिदायतुल्ला अन्सारी ( रिझर्व्ह बँक ) २५-११, १०-२५ व २५-१६
संदीप जोगळे ( बी. इ. एस. टी. ) वि वि गजानन हळदणकर ( सचिवालय जिमखाना ) १५-२५, २५-११, २५-११
रीतिकेश वाल्मिकी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि जयसिंग चारानिया ( बोरीचा स्पोर्ट्स क्लब ) १०-२५, २५-१० व २५-१५
ओमकार टिळक ( बँक ऑफ इंडिया ) वि वि विनोद बारिया ( मुंबई महानगरपालिका ) १८-२५, २५-१९ व २५-८
लियाकत नागरजी ( विजय कॅरम क्लब ) वि वि कमलेश राठोड ( वालपाखडी कॅरम क्लब ) २५-५, १६-२१ व २५-१६
महिला एकेरी पहिल्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे
समिधा जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ) वि वि सेजल लिखांडे ( डी. के. सी. सी. ) २५-१४, २५-२०
वर्षा पंडित ( रिझर्व्ह बँक ) वि वि अदिती नागावकर ( ए. के. एफ ) २५-११, ६-२५ व २५-८
समृद्धी चव्हाण ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगाव ) वि वि भाग्यश्री राणे ( पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लब ) २५-१३, ०-२५ व २५-१४