पुण्यापुढे विजयासाठी 163 धावांचे आव्हान
By admin | Published: May 5, 2016 09:37 PM2016-05-05T21:37:24+5:302016-05-05T21:57:29+5:30
रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दिल्लीची अनुभवी तगडी फलंदजी ढासळली, दिल्लीने निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात धावा १६२ केल्या
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दिल्लीची अनुभवी तगडी फलंदजी ढासळली, दिल्लीने निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात धावा १६२ केल्या. पुणे संघाला या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी २० षटकात १६३ धावांची गरज आहे. कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या शिस्तबद्ध गोलंदाजी पुढे सर्वचं महत्वाच्या फलंदाजांनी नांगी टाकाली. मागील सामन्यात चागंली फलंदाजी करणारा पंथ आज वैयक्तिक २ धावावर बाद झाला. त्याला डिंडाने बाद केले.
सॅमसन आणइ नायर यांनी डाव सावरण्याचा अशस्वी प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची बागीदारी केली. सॅमसन २० तर नायर ३२ धांवावर बाद झाला. ब्रिथवेट आणि बिल्गिंजने थोडाफार संघर्ष केला पण फार काळ ते मैदानावर तग धरु शकले नाहीत. ब्रिथवेट(२०), बिल्गिंज(२४), ड्युमीनी (३४), जे यादव (१) सपस्शेल अपयशी ठरले. पवन नेगीने १९ धावांचे योगदान दिले.
दिल्लीकडून रजत भाटीया आणि बोलंड यांनी प्रत्येकी २ फलंदांजाना बाद केले. तर डिंडाने एकाला तंबूचा रस्ता दाखवला.