Coronavirus : आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून आॅलिम्पिक स्थगित करण्याचे अपील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 02:10 AM2020-03-23T02:10:53+5:302020-03-23T02:11:18+5:30

ग्लोबल अ‍ॅथलिटने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, ‘संपूर्ण विश्व कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी एकजूट झाले आहे. अशा स्थितीत आयओसीलानेही विचार करावा.

Coronavirus: appeal from international players to postpone the Olympics | Coronavirus : आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून आॅलिम्पिक स्थगित करण्याचे अपील

Coronavirus : आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून आॅलिम्पिक स्थगित करण्याचे अपील

Next

टोकियो : आॅलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या संभाव्य खेळाडूंचा संघ (ग्लोबल अ‍ॅथलिट) यांनी कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्याची अपील केले आहे.
ग्लोबल अ‍ॅथलिटने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, ‘संपूर्ण विश्व कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी एकजूट झाले आहे. अशा स्थितीत आयओसीलानेही विचार करावा. आॅलिम्पिक स्पर्धा २४ जुलैपासून सुरू होणार आहे. सध्याची स्थिती पाहता आॅलिम्पिक स्पर्धेवर संशयाचे ढग आहेत. यासाठी आयओसी जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला घेत आहे. यासंदर्भात ताबडतोब निर्णय घेणे घाईचे होईल, या आपल्या मतावर आयओसी कायम आहे. ग्लोबल अ‍ॅथलिटचे संस्थापक कराड ओ डोनोवान म्हणाले की, ‘आयओसी सध्याचे दिवस सर्वसामान्य दिवसांप्रमाणे समजत आहे. त्यांचा याबाबतचा दृष्टिकोन विचित्र वाटत आहे.’

Web Title: Coronavirus: appeal from international players to postpone the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.