मुंबई : गुणवान क्रिकेटपटूंसाठी नवी संधी उपलब्ध करुन देताना ट्रू प्रीमिअर लीग (टीपीएल) क्रिकेट स्पर्धेचे मुंबईत उद्घाटन झाले. युवा क्रिकेटपटूंसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देणारी ही स्पर्धा देशातील पहिलीच क्रिकेट टॅलेंट हंट म्हणून ओळखली जाईल. माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीनच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेल्या या स्पर्धेत १६ ते ३० या वयोगटातील खेळाडू सहभाग घेऊ शकतात. तसेच इच्छुक खेळाडूंना टीपीएलमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी ६६६.स्र’ं८4३स्र’.ूङ्मे या संकेतस्थळावर मोफत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आतापर्यंत १५ हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. टी२० फॉरमॅटच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबिर पार पडल्यानंतर महाराष्ट्रात सुमारे ५०० संघांदरम्यान सामने खेळविले जातील. त्याचवेळी, टीपीएलचा उद्घाटनीय सामना २७ मेला मुंबईत खेळविला जाईल. उद्योजक व या लीगचे आयोजक असलेले जहीर राणा यांनी या उपक्रमाबाबत सांगितले, ‘भारतात प्रथमच असे क्रिकेट हंट होत आहे. मोहम्मद अझहरुद्दीन, विनोद कांबळी आणि चेतन शर्मा यांसारखे दिग्गज माजी क्रिकेटपटू या स्पर्धेत युवांना मार्गदर्शन करतील. या स्पर्धेतून नक्कीच उदयोन्मुख क्रिकेट स्टार्स पुढे येतील’. (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात होणार क्रिकेट टॅलेंट हंटचे आयोजन
By admin | Published: May 04, 2017 12:36 AM