मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्ताने 'दांडी सॉल्ट चॅलेंज'चे आयोजन करण्यात आले आहे. हे चॅलेंज मार्च महिन्यामध्ये गुजरात येथे होणार आहे. या चॅलेंजच्या वेळी महात्मा गांधी यांचे नातू तुषारही उपस्थित राहणार आहेत.
'दांडी सॉल्ट चॅलेंज'मध्ये मॅरेथॉन, सायकलिंग आणि चालणे या तीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा गुजरातमधील साबरमती आश्रम येथून सुरु होणार असून दांडी येथे संपणार आहे. मुंबईतील आयआयटी येथे नुकतीच पूर्ण आणि अर्ध मॅरेथॉन पार पडली. दांडी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या 81 जणांचे पुतळे यावेळी बनवण्यात आले होते.
याबाबत तुषार गांधी म्हणाले की, " महात्मा गांधी यांना आमच्याकडून ही छोटीशी भेट असेल. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी दांडी यात्रा काढली होती. 2005 साली मीदेखील हा प्रवास केला होता. आता मोठ्या संख्येने मार्चमध्ये आम्ही हा प्रवास करणार आहोत. यावेळी 'दांडी सॉल्ट चॅलेंज'ही होणार आहे."