नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या जिम्नास्टिक्सपटू दीपा कर्माकरने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. तुर्कस्थान येथे सुरु असलेल्या जिम्नास्टिक्स वर्ल्ड चॅलेंजकपमध्ये दीपाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतील दीपाचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
या स्पर्धेत दीपाने प्रोडुनोव्हा या प्रकारात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे व्हॉल्ट या प्रकारात दीपा कशी कामगिरी करते याकडे साऱ्यांचे लक्ष होते. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत दीपाने 13.400 एवढे गुण कमावले होते. पण या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मात्र दीपाने आपली कामगिरी सुधारली. अंतिम फेरीत दीपाने 14.150 गुण कमावत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर दीपा खेळण्यासाठी उतरली होती. पण यावेळी खेळताना दीपाने लौकिकाला साजेसा खेळ केला आणि वर्ल्ड चॅलेंजकपमध्ये व्हॉल्ट प्रकारात अव्वल कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
पंतप्रधान मोदींनी दिल्या दीपाला शुभेच्छा