अर्जुन पुरस्कारातून डावलल्याने गौरवचे समितीवर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:32 AM2017-08-10T01:32:45+5:302017-08-10T01:33:18+5:30
मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.
नवी दिल्ली : मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.
आशिया पॅसिफिक रॅलीचा दोनदा चॅम्पियन राहिलेला गौरव म्हणाला, ‘गोल्फ, कॅरम आणि क्यू स्पोर्टस्ला सरकार मान्यता देत असेल तर शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक मोटर रेसिंगसारख्या खेळाला ओळख का मिळत नाही. गोल्फ, कॅरम आणि क्यू स्पोर्टस्मधील खेळाडूंचा मी सन्मान करतो; पण हे तिन्ही खेळ पूर्ण स्वरूपात खेळ नाहीत, असे माझे प्रांजळ मत आहे.’
मोटर स्पोर्टस्ला सरकारने मान्यता दिल्यास मोठा लाभ होईल, असे सांगून ३५ वर्षांचा गौरव पुढे म्हणाला, ‘या खेळात करियर करणाºया युवकांची संख्या वाढावी यासाठी सरकारने खेळाला अर्जुन पुरस्कार जाहीर करायला हवा. क्रीडा मंत्रालयाने मोटर स्पोर्टस् फेडरेशन आणि मोटर स्पोर्टस् क्लब आॅफ इंडियाला अधिकृत मान्यता द्यावी.’ २०१० मध्ये या खेळातील नरेन कार्तिकेयनला अर्जुन पुरस्कार देण्यात आल्याचे स्मरण गौरवने करून दिले. अर्जुन पुरस्कारासाठी आशियाई, राष्टÑकुल तसेच आॅलिम्पिकमध्ये सहभागी खेळांच्या खेळाडूंचाच विचार केला जातो. (वृत्तसंस्था)
क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये समावेश नाही; पण लोकप्रियतेच्या आधारे या प्रकाराचे खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरतात. याकडे लक्ष वेधून गौरव पुढे म्हणाला,‘एखादा क्रिकेटपटू कधी कधी चांगली कामगिरी करीत हा पुरस्कार जिंकतो. ही अन्य खेळाडूंची अवहेलना ठरते. माझ्या खेळात मी जगातील अतिशय उत्कृष्ट खेळाडूंसोबत चढाओढ करीत असूनही मला पाठिंबा मिळताना दिसत नाही.
- गौरव गिल, मोटर स्पोर्टस् स्टार