इब्राहिमोविच घेणार संन्यास
By admin | Published: June 22, 2016 07:25 PM2016-06-22T19:25:48+5:302016-06-22T19:25:48+5:30
युरो २०१६ नंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची घोषणा स्वीडनचा स्टार स्ट्रायकर जाल्टन इब्राहिमोविच याने केली

इब्राहिमोविच घेणार संन्यास
Next
ऑनलाइन लोकमत
नीस(फ्रान्स), दि. 22- युरो २०१६ नंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची घोषणा स्वीडनचा स्टार स्ट्रायकर जाल्टन इब्राहिमोविच याने केली आहे. ३४ वर्षांची इब्राहिमोविच बेल्जियम विरोधातील ग्रुप ई मधील अखेरच्या सामन्यापुर्वी म्हणाला की, ‘‘ युरोत होणारा स्विडनचा अखेरचा सामना हा माझा स्विडनकडून खेळला जाणारा अखेरचा सामना ठरेल. त्यामुळे हा उद्याचा सामना अखेरचा ठरणार नाही, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.’’
आॅगस्टमध्ये होणाऱ्या आॅलिम्पीक स्पर्धेत खेळण्याच्या शक्यतेला त्याने नकार दिला. स्वीडनचे प्रशिक्षक एरिक हैमरन म्हणाले की, ‘‘ हे एक मोठे नुकसान असेल. तो एक उत्तम खेळाडू आहे.’’