इंग्लंडचा झंझावाती विजय

By Admin | Published: October 15, 2016 01:34 AM2016-10-15T01:34:06+5:302016-10-15T01:34:06+5:30

सुरुवातीला घेतलेल्या सावध पवित्र्यानंतर जबरदस्त वेग वाढवलेल्या इंग्लंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात अर्जेंटिनाचा ६८-२८ असा धुव्वा

England's Surprise Victory | इंग्लंडचा झंझावाती विजय

इंग्लंडचा झंझावाती विजय

googlenewsNext

अहमदाबाद : सुरुवातीला घेतलेल्या सावध पवित्र्यानंतर जबरदस्त वेग वाढवलेल्या इंग्लंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात अर्जेंटिनाचा ६८-२८ असा धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडने गटात तिसरे स्थान पटकावले.
आक्रमण आणि बचाव या दोन्ही क्षेत्रांत इंग्लंडने वरचढ कामगिरी करताना अर्जेंटिनाला आपला खेळ करण्याची पुरेशी संधीच दिली नाही. तुफान आक्रमण केलेल्या इंग्लंडच्या झंझवातापुढे अर्जेंटिनाचा काहीच निभाव लागला नाही. पुन्हा एकदा टोपे अ‍ॅडेवलरू याने निर्णायक खेळ करताना आक्रमणात तब्बल १९ गुणांसह अर्जेंटिनाची हवा काढली. कर्णधार सोमेश्वर कालियाने आक्रमणात ९ आणि बचावात ४ असा शानदार अष्टपैलू खेळ करताना १३ गुणांची वसुली केली. तसेच, केशव गुप्तानेही खोलवर आक्रमण करताना १० गुणांसह संघाच्या विजयात हातभार लावला.
मध्यंतरालाच इंग्लंडने ३३-९ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. यानंतर इंग्लंडने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यापुढे त्यांनी पुनरागमनाचे प्रयत्नही सोडले. अर्जेंटिनाकडून मारियानो पास्कल याने सर्वाधिक ६ गुण मिळवले, तर कर्णधार रोमन सीसारो आणि नेहुएल लोपेझ यांचा झुंजार खेळही अपयशी ठरला. इंग्लंडने अर्जेंटिनावर तब्बल ५ लोण चढवून आपला दबदबा राखला. (वृत्तसंस्था)

Web Title: England's Surprise Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.