युरो चषक : क्रोएशियाचा रोमहर्षक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 06:41 PM2016-06-22T18:41:26+5:302016-06-22T18:41:26+5:30

सामना संपण्यास केवळ तीन मिनिटे शिल्लक असताना इवान पॅरिसिच याने गोल नोंदवला.

Euro Cup: Croatia's Thrilling Victory | युरो चषक : क्रोएशियाचा रोमहर्षक विजय

युरो चषक : क्रोएशियाचा रोमहर्षक विजय

Next

ऑनलाइन लोकमत

पॅरिस, दि. 22 - सामना संपण्यास केवळ तीन मिनिटे शिल्लक असताना इवान पॅरिसिच याने गोल नोंदवला. त्याच्या या अप्रतिम गोलच्या बळावर क्रोएशियाने स्पेनवर २-१ ने रोमहर्षक विजय साजरा केला. युरो चषक २०१६ स्पर्धेतील ड गटातील हा एक लक्षवेधी विजय ठरला. आता स्पेनचा अंतिम १६ तील सामना इटलीसारख्या मजबूत संघाविरुद्ध होणाार आहे. हा सामना २०१२ च्या युरो चषकातील फायनलची पुनरावृत्ती असेल. तर क्रोएशिया संघ श्निवारी तिसऱ्या क्रमांकावरील संघाविरुद्ध भिडेल.
दुसरीकडे, या पराभवामुळे स्पेनचा पुढील मार्ग कठीण बनला आहे. २००४ नंतर गेल्या १२ वर्षांतील युरो चषकातील स्पेनचा हा पहिला पराभव आहे. स्पेनचा गेल्या १५ सामन्यांतील हा पहिला धक्कादायक पराभव केला. पराभवानंतर स्पेन संघ ड गटात दुसऱ्या स्थानावर घसरला.
कोएशिया सुरुवातीपासून आक्रमक होता. त्यांनी स्पेनवर दबाव निर्माण केला. पहिला गोल स्पेनचा फॉरवर्ड अल्वारो मोराटाने सातव्या मिनिटाला नोंदवत क्रोएशियाला धक्का दिला होता. मात्र, त्याच्या या गोलचा दबाव क्रोएशियावर दिसला नाही. स्पेनने ही आघाडी ४५ व्या मिनिटांपर्यंत कायम राखली होती. त्यानंतर फॉरवर्ड निकोला कॅलिनिकने क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर स्पेनला ७२ व्या मिनिटाला पेनल्टीवर संधी मिळालीहोती. मात्र, त्यांनी ती घालविली. निर्धारित वेळेच्या तीन मिनिटांपूर्वी (८७ व्या मिनिटाला) इवान याने अप्रतिम गोल नोंदवला आणि स्पेनला जबर धक्का दिला.

 

तुर्कीच्या आशा कायम

लेंस- चेक गणराज्य संघाचा २-० ने पराभव करीत तुर्कीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील आशा कायम ठेवल्या आहेत. ‘ड’ गटातील या सामन्यात तुर्कीचा फॉरवर्ड बुराक यिल्माजने सामन्याच्या १० व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला होता. दुसºया हाफमध्ये मिडफिल्डर ओजान तुफनने ६५ व्या मिनिटाला गोल नोंदवत२-० ने आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांना विजयासाठी पुरेशी ठरली. या विजयानंतर तुर्की संघ तिसºया स्थानावर पोहचला. आता अंतिम १६ तील त्यांच्या आशा कायम आहेत. असे असले तरी त्यांना पुढील सामन्यांच्या निकालाची प्र्रतीक्षा करावी लागेल. दुसरीकडे, चेक प्रजासत्ताक मात्र स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

Web Title: Euro Cup: Croatia's Thrilling Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.