शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

युरो चषक : क्रोएशियाचा रोमहर्षक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 6:41 PM

सामना संपण्यास केवळ तीन मिनिटे शिल्लक असताना इवान पॅरिसिच याने गोल नोंदवला.

ऑनलाइन लोकमत

पॅरिस, दि. 22 - सामना संपण्यास केवळ तीन मिनिटे शिल्लक असताना इवान पॅरिसिच याने गोल नोंदवला. त्याच्या या अप्रतिम गोलच्या बळावर क्रोएशियाने स्पेनवर २-१ ने रोमहर्षक विजय साजरा केला. युरो चषक २०१६ स्पर्धेतील ड गटातील हा एक लक्षवेधी विजय ठरला. आता स्पेनचा अंतिम १६ तील सामना इटलीसारख्या मजबूत संघाविरुद्ध होणाार आहे. हा सामना २०१२ च्या युरो चषकातील फायनलची पुनरावृत्ती असेल. तर क्रोएशिया संघ श्निवारी तिसऱ्या क्रमांकावरील संघाविरुद्ध भिडेल.दुसरीकडे, या पराभवामुळे स्पेनचा पुढील मार्ग कठीण बनला आहे. २००४ नंतर गेल्या १२ वर्षांतील युरो चषकातील स्पेनचा हा पहिला पराभव आहे. स्पेनचा गेल्या १५ सामन्यांतील हा पहिला धक्कादायक पराभव केला. पराभवानंतर स्पेन संघ ड गटात दुसऱ्या स्थानावर घसरला. कोएशिया सुरुवातीपासून आक्रमक होता. त्यांनी स्पेनवर दबाव निर्माण केला. पहिला गोल स्पेनचा फॉरवर्ड अल्वारो मोराटाने सातव्या मिनिटाला नोंदवत क्रोएशियाला धक्का दिला होता. मात्र, त्याच्या या गोलचा दबाव क्रोएशियावर दिसला नाही. स्पेनने ही आघाडी ४५ व्या मिनिटांपर्यंत कायम राखली होती. त्यानंतर फॉरवर्ड निकोला कॅलिनिकने क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर स्पेनला ७२ व्या मिनिटाला पेनल्टीवर संधी मिळालीहोती. मात्र, त्यांनी ती घालविली. निर्धारित वेळेच्या तीन मिनिटांपूर्वी (८७ व्या मिनिटाला) इवान याने अप्रतिम गोल नोंदवला आणि स्पेनला जबर धक्का दिला.

 

तुर्कीच्या आशा कायम
लेंस- चेक गणराज्य संघाचा २-० ने पराभव करीत तुर्कीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील आशा कायम ठेवल्या आहेत. ‘ड’ गटातील या सामन्यात तुर्कीचा फॉरवर्ड बुराक यिल्माजने सामन्याच्या १० व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला होता. दुसºया हाफमध्ये मिडफिल्डर ओजान तुफनने ६५ व्या मिनिटाला गोल नोंदवत२-० ने आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांना विजयासाठी पुरेशी ठरली. या विजयानंतर तुर्की संघ तिसºया स्थानावर पोहचला. आता अंतिम १६ तील त्यांच्या आशा कायम आहेत. असे असले तरी त्यांना पुढील सामन्यांच्या निकालाची प्र्रतीक्षा करावी लागेल. दुसरीकडे, चेक प्रजासत्ताक मात्र स्पर्धेतून बाहेर झाला आहे.