शेंदोळा खुर्द येथे आजपासून विदर्भस्तरीय खंजिरी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:07 PM2020-01-10T19:07:35+5:302020-01-10T19:07:40+5:30
नागपूर येथील मास्टर रोशन ऊर्फ लालचंद डांगे आणि त्यांचा संच हे सुफी कव्वाली सादर करतील.
अमरावती: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जाज्वल्य विचार गावोगावी, खेडोपाडी पोहचविण्याकरिता विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन श्रीगुरुदेव खंजिरी भजन मंडळ आणि ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ जानेवारी रोजी शेंदोळा खुर्द येथे करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना आणि त्यानंतर सुफी कव्वालीने होईल.
नागपूर येथील मास्टर रोशन ऊर्फ लालचंद डांगे आणि त्यांचा संच हे सुफी कव्वाली सादर करतील. स्पर्धेचे उद्घाटन रात्री ८.३० वाजता अमरावती येथील महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख स्रेहशिष दास यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीगुरुदेव सेवाश्रमाचे आजीवन प्रचारक घनश्याम पिकले राहतील.
प्रमुख उपस्थिती कृष्णराव पाहुणे (बोरगाव मेघे), श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाच्या माधुरी भोयर, उद्धवराव वानखडे (गुरुकुंज आश्रम), अरविंद राठोड (गुरुकुंज आश्रम), डॉ. प्रमोद बैस उपस्थित राहणार आहे. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेतली जात असून, प्रौढ, महिला, बाल या तिन्ही गटांना आकर्षक बक्षिसे आहेत.