ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल, शारीरिक व मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 12:01 PM2019-05-17T12:01:46+5:302019-05-17T12:02:37+5:30

2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू भोकनळवर गुन्हा दाखक करण्यात आला आहे.

FIR against Olympic Rowing player Dattu Bhokanal | ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल, शारीरिक व मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप

ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल, शारीरिक व मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप

Next

नाशिक : 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू भोकनळवर गुन्हा दाखक करण्यात आला आहे. कथित पत्नीनं दत्तूवर शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे आणि त्यानुसार दत्तूवर कलम 498/420 नुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही नाशिक ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. 

फिर्यादी महिलेच्या सांगण्यानुसार दत्तू आणि तिनं दोन वर्षांपूर्वी पुण्यात हिंदू धर्म वैदीक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर दत्तूनं तिला पुन्हा थाटामाटात लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु दोनवेळा तारीख ठरवूनही दत्तू लग्नाला हजर राहिला नाही आणि त्यानंतर त्यानं संबंध तोडण्यास सांगितल्याचा दावा महिलेने केला. या दोन वर्षांत दत्तूनं मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोपही महिलेने केला. 

दत्तूनं 2015च्या आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची, तर 2018च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 

Web Title: FIR against Olympic Rowing player Dattu Bhokanal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.