सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून चार खेळाडू लंडनच्या अकादमीमध्ये जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:51 PM2019-09-27T23:51:16+5:302019-09-27T23:51:42+5:30

या चार जणांची निवड डिसेंबरमध्ये झालेल्या क्यूपीआर साऊथ मुंबई ज्युनियर सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून करण्यात आली.

Four players from the soccer challenger Talent Hunt will go to London's academy | सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून चार खेळाडू लंडनच्या अकादमीमध्ये जाणार

सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून चार खेळाडू लंडनच्या अकादमीमध्ये जाणार

Next

मुंबईमुंबईतून दोन मुले आणि मुली अशा एकूण चार जणांची निवड लंडन येथील फुटबॉल क्लब क्विन्स पार्क रेंजर्स मध्ये सराव करण्यासाठी झाली आहे. या चार जणांची निवड डिसेंबरमध्ये झालेल्या क्यूपीआर साऊथ मुंबई ज्युनियर सॉकर चॅलेंजर टॅलेंट हंटमधून करण्यात आली.

योहान पुनावाला (बॉम्बे इंटरनॅशनल स्कुल), सागर राठोड (कुलाबा म्युनिसिपल अपर प्रायमरी इंग्लिश), निष्का प्रकाश (एज्युब्रिज इंटरनॅशनल) आणि अदिती पांदिरे (साई बाबा पथ मुंबई पब्लिक स्कुल) या चार जणांची निवड करण्यात आली.देवरा यांनी चारही जणांना क्यूपीआर संघाची जर्सी व लंडनला जाण्यासाठी लागणारे कागदपत्र दिले. ही सर्व मुले 2 ऑक्टोबरला लंडनला रवाना होणार आहेत.

   या चॅम्पियनशिपमध्ये 165 शाळांमधून 6600 मुले सहभागी झाली. हजारहुन अधिक सामने खेळविण्यात आले. त्यामधील एकूण 75 टक्के सहभागी पैकी  30 टक्के सहभाग मुलींचा होता.व्यवसायिक प्रशिक्षकाकडून 60 जणांची निवड करण्यात आली. त्यामधून ही चार मुले निवडली.

…......

निवड झालेल्या निवडक मुलांची माहिती;

- सागर राठोड : 13 वर्ष (मिडफिल्डर)

- ऑस्कर फाउंडेशन एसएसईकडून युरो कप, पोर्तुगाल मध्ये सहभाग

-लंडनमध्ये ऑस्कर फाउंडेशन एसएसईकडून सहभाग

- 13 वर्षाखालील आय लीग स्पर्धेत सहभाग

.......

-- निष्का प्रकाश : 14 वर्ष (सेंटर फॉरवर्ड)

- एमडीएफए महिला डिव्हिजनमध्ये सहभाग

-विफा महिला लीगमध्ये सहभाग

-एफसीबी एसकोला सोबत मुंबईत सराव

....

योहान पुनावाला : 14 वर्ष (सेंटर बॅक)

- मुंबई जिल्हा 14 वर्षाखालील संघाकडून सहभाग

- एमडीएफए 14 वर्षाखालील संघाकडून सहभाग

…......

आदिती पांदिरे : 13 वर्ष (मिडफिल्डर)

-डीएसओ 14 वर्षाखालील संघाकडून सहभाग

-बिवीबी एवोनिक कॅम्पमध्ये सहभाग

Web Title: Four players from the soccer challenger Talent Hunt will go to London's academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.