Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटाच्या अंतिम फेरीत चिनी खेळाडूंना कडवी टक्कर दिले. अखेरच्या फेरीत जबरदस्त कमबॅक करताना सिंगराजनं २१६.८ गुणांसह कांस्यपदक निश्चित केलं. भारताच्या खात्यात आता २ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्यपदकांसह ८ पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. ( India's Singhraj bagged the bronze medal in shooting P1 men's 10m air pistol SH1 final at the Tokyo Paralympics)
सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले, तर देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला.