ठळक मुद्देहिमा दासने जगतिक कनिष्ठ स्पर्धेत घडवला इतिहासट्रॅक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला भारतीयआशियाई स्पर्धेतही सुवर्णसह तीन पदकांची कमाई
मुंबई : भारताची सुवर्णकन्या हिमा दासची UNICEF India ची युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवकांना निर्णयक्षमतेत कसे सहकार्य करावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी हिमा मार्गदर्शन करणार आहे. आसाममधील नागाव येथून २० किलोमीटर दूर असलेल्या कांधूलिमारी या दुर्गम भागातल्या हिमाने स्वकतृत्वावर मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे तिचे मार्गदर्शन युवकांसाठी नक्की प्रेरणादायी असेल. फिनलँड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत ४०० मीटरचे सुवर्ण जिंकून हिमाने इतिहास रचला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यानंतर जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने ४०० मीटर शर्यतीचे रौप्य पटकवले. शिवाय महिलांच्या चार बाय ४०० मीटरचे सुवर्ण आणि ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या अभिमानास्पद कामगिरीमुळे तिला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.