महाराष्ट्रात अॅथलेटिक्स या खेळात अग्रेसर असलेल्या व्ही. पी. एम. स्पोर्टस् क्लब दहिसर चे 30 वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमात सन 2019 -20 ह्या वर्षातील क्लबच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. या वर्षी सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा मान मुलांमध्ये अभिजित नायर व मुली मध्ये श्रावणी माळी यांनी पटकावला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एन. एल. महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक अॅनसी जोस यांचा व्हीपीएम भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. व्ही पी एम स्पोर्टस् क्लबचे माजी अध्यक्ष श्री. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते अॅनसी जोस यांना स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात आली. सन 2019 -20 मध्ये क्लबनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत 151 सुर्वण,110 रौप्य व 92 कांस्य अशी एकूण 353 पदके पटकावून या वर्षीही आपले वर्चस्व कायम ठेवले.
- आदर्श खेळाडू - मंदार वसईकर व पूर्णा रावराणे
- सर्वोत्कृष्ट खेळाडू - अभिजित नायर व श्रावणी माळी
- आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू - करण हेगिस्टे, रश्मी शेरेगर, राधिका गुप्ता
- राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू - पूर्णा रावराणे, मंदार वसईकर, आकाश सिंग, उर्विश पोखरियाल, शिवबा नारकर, समृद्धी शेट्टी, स्नेहा तायशेटे
- राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व - अनिरुद्ध अय्यर, अभिजित नायर, साक्षी परमार, सादगी मोरे, श्रावणी माळी, राघवी पास्कर, काव्या देसाई
- विशेष प्राविण्य मिळवणारे खेळाडू - श्रिया पाटील, रमण दमाणी, गायत्री रेडकर
- राज्यस्तरावर मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू - सिद्धांत फर्नांडिस, रिद्धीश भट्ट, श्रीकांत राणा, तनिष देसले, आदित्य भागवत, पर्व ठाकूर, साहिल साटम, क्रिश सोलंखी, रिषिका शेट्टी, शिप्रा जयराजन, श्रावणी बांगर, शैवि मेहता, जनई पाटील