दिल्लीला पंजाबविरुद्ध विजयाची आशा
By admin | Published: May 7, 2016 01:19 AM2016-05-07T01:19:41+5:302016-05-07T01:19:41+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वात नव्या जोशासह खेळत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शनिवारी किंग्स पंजाब इलेव्हनवर विजय नोंदवित विजयी पथावर येण्याची उत्कृष्ट संधी असेल.
मोहाली : आयपीएलच्या नवव्या पर्वात नव्या जोशासह खेळत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शनिवारी किंग्स पंजाब इलेव्हनवर विजय नोंदवित विजयी पथावर येण्याची उत्कृष्ट संधी असेल.
दिल्ली संघ गुरुवारी आपल्याच मैदानावर रायझिंग पुणे सुपरजायंटसविरुद्ध सात गड्यांनी पराभूत झाला होता. त्यामुळे गुणतालिकेत हा संघ दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानावर आला. पंजाब संघ आठपैकी सहा सामन्यांत पराभूत झाल्याने अखेरच्या स्थानावर आहे. विजयासमीप येऊनही हा संघ वारंवार पराभूत होत आहे. चढउतार पाहणाऱ्या पंजाबने मागच्या सामन्यात कोलकाताविरुद्ध विजयाची पराकाष्ठा केली पण त्यांना सामना गमवावा लागला. त्याआधी गुजरात लॉयन्सवर या संघाने २३ धावांनी विजय नोंदविला होता. नवा कर्णधार मुरली विजय हा देखील संघाला विजय मिळवून देण्यात अपयशीच ठरला. सलग दोन सामने गमविल्याने संघाचे मनोबळ ढासळले आहे.
दुसरीकडे दिल्लीला पंजाबला नमवण्याची संधी असेल, तरी पंजाब मुसंडी मारू शकतो हे ध्यानात घेऊनच दिल्लीला सावध राहावे लागेल.