हैदराबादला विजयासाठी १२७ धावांची गरज
By admin | Published: May 6, 2016 09:41 PM2016-05-06T21:41:05+5:302016-05-06T21:41:05+5:30
गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगीरीच्या जोरावर हैदराबाद सनराजसर्स संघाने गुसराज लायन्स संघाला २० षटकात १२६ धावावर रोखले. हैदराबाद संघाला विजयासाठी १२७ धावांची आवशकता आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ६ : गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगीरीच्या जोरावर हैदराबाद सनराजसर्स संघाने गुसराज लायन्स संघाला २० षटकात १२६ धावावर रोखले. हैदराबाद संघाला विजयासाठी १२७ धावांची आवशकता आहे. भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजुर, नेहरा यांच्या धारधार गोलंदाजीपुढे गुजरातची तगडी फलंदाजी ढासळली. स्मिथ, रैना, मॅक्युलम, ब्राव्हो, जाडेजासारखे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. मोक्याच्या क्षणी अॅरोन फिंचने संयमी फलंदाजी करताना ४२ चेंडूत ५२ धावा केल्या. फिंचच्या खेळीच्या जोरावर गुजरातने १०० धावांचा आकडा पार केला. स्मिथ १, रैना२०, मॅक्युलम ७, ब्राव्हो१८, कार्तिक ०, जाडेजा १८ धावांची खेळी केली. हैदराबाद कडून अंतिम ११ मध्ये अनुभवी युवराज सिंगला स्तान देण्यात आलेय.
हैदराबाद तर्फे भुवनेश्वर कुमार, मुस्तफुजुरने टिचून गोलंदाजी करताना प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. सरन आणइ हेन्रिक्सने एक-एक फलंदाज बाद केले.