खेळाचा चांगला दर्जा अनुभवायला मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:04 AM2020-03-02T04:04:37+5:302020-03-02T04:04:46+5:30
मी जेव्हा खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धाचे प्रसारण बघते त्यावेळी एक गोष्ट चांगली वाटते ती प्रसारणाची शानदार गुणवत्ता.
- अंजू बॉबी जॉर्ज लिहितात...
मी जेव्हा खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धाचे प्रसारण बघते त्यावेळी एक गोष्ट चांगली वाटते ती प्रसारणाची शानदार गुणवत्ता. मला आठवते की, २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये लांब उडी स्पर्धेचे रेकॉर्डिंग मला बघता आले नव्हते. सध्या खेळाडूंना उच्च दर्जाचे रिप्ले बघता येतात. अनेक क्लीप्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत.
मला विश्वास आहे की, खेलो इंडिया कार्यक्रम शानदार आहे. ही स्पर्धा आता विद्यापीठ पातळीवर पोहचणे आणखी शानदार आहे. गुणवत्ता पुढे येण्यासाठी आता अनेक संधी निर्माण झाल्या असून हे आवश्यक होते. खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून खेळाचा चांगला दर्जा अनुभवायला मिळत आहे. भविष्यात त्याचा लाभ भारताला नक्कीच मिळेल.
प्रदीर्घ कालावधीपासून आपल्याकडे असे खेळाडू आहेत की ज्यांनी ज्युनिअर पातळीवर शानदार कामगिरी केली. पण सिनियर पातळीचा विचार करता ते कुठे गडप झाले, हे कळलेच नाही. खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये खेळाडू, प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण विभाग व विद्यापीठांनाही या पातळीवर आपली छाप सोडण्याची संधी मिळेल. त्यासाठी कदाचित वेळ लागेल. पण अमेरिकेप्रमाणे महाविद्यालयीन स्पर्धांतून चॅम्पियन पुढे येताना बघणे सुखावणारे राहील, जर विद्यापीठ पातळीवर क्रीडा गुणवत्तेचे पैलू पाडता आले आणि युवा खेळाडूंना योग्यवेळी योग्य वातावरण व योग्य दिशा मिळाली तर देशातील क्रीडा वर्तुळाला मोठा लाभ होईल.
दरम्यान, द्रोणाचार्य जे. एस. सैनी यांच्या निधनाचे वृत्त ऐकले त्यावेळी विद्यापीठाचे प्रशिक्षक खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी मदत करू शकतात, हे सांगणे कठीण वाटते. खेलो इंडिया विद्यापीठ गेम्सच्या सुरुवातीमुळे प्रशिक्षकांना खेळाडूंची गुणवत्ता शोधून जगापुढे ओळख निर्माण करून देण्याची अतिरिक्त संधी मिळाली आहे.
खेळाडूंनी केवळ आपल्या स्पर्धेतच नाही, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरावे. या उद्देशाने शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ प्रयत्न करतील, अशी आशा आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा युवा खेळाडूंना त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या शिक्षण संस्थांनाही मदत करतील, अशी मला आशा आहे. मी खेलो इंडिया विद्यापीठ गेम्सच्या उपयोगितेबाबत अनेक टिपणी ऐकल्या आहेत. पण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळ प्रकाशझोतात आल्याचे मी अनुभवले आहे.