गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या भारताच्या बॉक्सिंग संघाने सोमवारी उत्तेजक चाचणी द्यायला नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी येथील क्रीडाग्रामामध्ये उत्तेजकांची इंजेक्शन सापडली होती. त्यामुळे क्रीडाग्रामामध्ये एकच खळबळ उडाली होती.
ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे 4 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 71 देशांचा सहभाग असून 6600 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी क्रीडाग्रामामध्ये जो काही प्रकार घडला तो खेळासाठी घातकच आहे. पण आमच्या खेळाडूंचा त्यामध्ये सहभाग नाही. त्याचबरोबर जर वातावरण एवढे दुषित असेल तर आम्ही उत्तेजन सेवन चाचणी देणार नाही. हे सारे प्रकार आम्ही केलेले नाहीत त्यामुळे आम्ही चाचणी देणार नाही, असे भारतीय बॉक्सिंग संघाने स्पष्ट केले आहे.