भारत पूर्ण तयारीने उतरणार

By admin | Published: March 10, 2016 03:28 AM2016-03-10T03:28:00+5:302016-03-10T03:28:00+5:30

सलग तीन सिरीजमध्ये विजय मिळवणारा भारतीय संघ कोलकतात गुरुवारी टी-२० विश्वचषक सराव सामन्यात वेस्टइंडीजविरोधात संपूर्ण तयारीने उतरणार आहे. हा सामना गुरुवारी होणार आहे.

India will be ready for full preparation | भारत पूर्ण तयारीने उतरणार

भारत पूर्ण तयारीने उतरणार

Next

कोलकाता : सलग तीन सिरीजमध्ये विजय मिळवणारा भारतीय संघ कोलकतात गुरुवारी टी-२० विश्वचषक सराव सामन्यात वेस्टइंडीजविरोधात संपूर्ण तयारीने उतरणार आहे. हा सामना गुरुवारी होणार आहे.
या सराव सामन्यात सर्वांचेच लक्ष्य जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर राहील. गुडघ्याच्या दुखापतीसोबतच हॅमस्ट्रिंगने त्रस्त असल्याने मैदानाबाहेर असलेला शमीचे संघात पुनरागमन होईल, अशी आशा आहे. वेस्ट इंडीज आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सराव सामन्यात शमीचा फिटनेस तपासला जाईल.
गोलंदाजीत अनुभवी आशिष नेहरा आणि नवोदित जसप्रीत बुमराह यांच्या जोडीने चांगले प्रदर्शन केले आहे. ११ सामन्यांत त्यांनी २५ गडी बाद केले. या जोडीला हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे कर्णधार धोनीची चिंता दूर झाली आहे. भारताने आॅस्ट्रेलियाविरोधातील तीन सामन्यांची मालिका, श्रीलंकेविरोधातील मालिका आणि आशिया कपमध्ये विजय मिळवला आहे. अंतिम अकरा खेळांडूमध्ये हरभजनसिंग आणि पवन नेगी यांनादेखील संधी मिळू शकते. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाची विजेती टीम इंडिया आणि २०१२ ची विश्वविजेती
वेस्ट इंडीज टीम टष्ट्वेंटी -२० तील प्रमुख संघ आहेत. मात्र, भारताचा संघ बऱ्याच काळापासून खेळत आहे. विंडीज संघ यंदा केरॉन पोलार्ड, सुनील नारायण आणि डॅरेन ब्रावो यांच्याशिवाय खेळेल.चांगले प्रदर्शन करावे लागेल : शास्त्री
कोलकाता : भारतीय संघ आता टी-२० च्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मात्र, टीम इंडिया आपले प्रदर्शन कायम चांगले ठेवेल आणि विश्वचषकासारख्या स्पर्धा जिंकण्याची सवय लावेल, असे संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
शास्त्री म्हणाले, की भारताकडे सर्वोत्तम संयोजन आहे आणि खेळाडू आयसीसीच्या स्पर्धेआधी चांगल्या फॉर्ममध्ये आले आहेत.
संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंह धोनी, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, शिखर धवन, हरभजनसिंग, रवींद्र जाडेजा, विराट कोहली, मोहम्मद शमी, पवन नेगी, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या, युवराजसिंह,
रोहित शर्मा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे.
वेस्ट इंडीज् : डॅरेन सॅमी, सॅम्युएल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्रावो, जॉन्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसन होल्डर, अ‍ॅश्ले नर्स, दिनेश रामदीन, मार्लोन सॅम्युअल्स, आंद्रे रसेल, जेम्स टेलर, इविन लेविस.
> वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमी म्हणाला, की आमच्या संघात १५ मॅचविनर खेळाडू आहेत. मी जेव्हा ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो, आंद्रे रसेल या सारख्या खेळाडूंकडे बघतो. तेव्हा मला काम सोपे वाटते. स्पर्धेच्या पुढच्या सत्रात अनेक खेळाडू संघात नसतील. तेव्हा या स्पर्धेला आम्ही नक्कीच चांगली
कामगिरी करू.

Web Title: India will be ready for full preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.