भारतीय तिरंदाजी पुरुष संघ चौथ्या स्थानी, विश्वचषक कम्पाऊंड पात्रता फेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:57 AM2019-05-08T04:57:10+5:302019-05-08T04:57:52+5:30

प्रशिक्षकाविना खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने येथे सुरू झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या कंपाऊंड प्रकारात पात्रता फेरीत चौथे स्थान मिळविले. प्रवीण कुमार याने वैयक्तिक गटात नववे स्थान मिळविले.

 Indian archery men's team fourth place, World Cup compound qualifying round | भारतीय तिरंदाजी पुरुष संघ चौथ्या स्थानी, विश्वचषक कम्पाऊंड पात्रता फेरी

भारतीय तिरंदाजी पुरुष संघ चौथ्या स्थानी, विश्वचषक कम्पाऊंड पात्रता फेरी

Next

शांघाय : प्रशिक्षकाविना खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने येथे सुरू झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या कंपाऊंड प्रकारात पात्रता फेरीत चौथे स्थान मिळविले. प्रवीण कुमार याने वैयक्तिक गटात नववे स्थान मिळविले.
प्रवीणने ७०४ गुणांची कमाई केली. यानंतर लवज्योत आणि गुरविंदर यांच्या सोबतीने प्रवीणने भारतीय संघासाठी २०९१ गुणांची कमाई करीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारताची पुढील फेरीत गाठ १३ व्या रँकिंगवर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध पडेल.
महिला कंपाऊंड प्रकारात परविना २० व्या स्थानी आली. मोनाली जाधव आणि प्रिया गुर्जर यांना अनुक्रमे २४ आणि २५ वे स्थान मिळाले. या तिघींचा भारतीय संघ पात्रता फेरीत सहाव्या स्थानी राहिला. मुख्य फेरीत भारतीय महिला संघाला ११ व्या स्थानावरील सिंगापूरविरुद्ध सामना खेळायचा आहे. भारतीय संघासोबत कंपाऊंड प्रकारात कुठलाही कोच गेलेला नाही.

Web Title:  Indian archery men's team fourth place, World Cup compound qualifying round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत