शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

भारताचे पारडे वरचढ

By admin | Published: June 22, 2016 3:30 AM

दुसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव करणारा पाहुणा भारतीय संघ आज बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

हरारे : दुसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव करणारा पाहुणा भारतीय संघ आज बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.भारताने वन-डे मालिकेत झिम्बाब्वेला ३-० ने ‘क्लीन स्वीप’ केले होते; पण शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पाहुण्या संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या लढतीत शानदार पुनरागमन करताना हरारे स्पोर्ट्स क्लबवर एकतर्फी विजय नोंदविला. भारतीय संघ आणखी एका सहज विजयाची नोंद करीत मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्यास उत्सुक आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील संघातील बरिंदर सरन, मनदीप सिंग, लोकेश राहुल आणि जसप्रीत बुमराह यांनी सोमवारी प्रभावी कामगिरी केली. युवा वेगवान गोलंदाज सरनने पदार्पणाच्या लढतीत भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी केली. मनदीपने अर्धशतकी खेळी केली, तर राहुलने शानदार फलंदाजी करताना संघाला सहज विजय मिळवून दिला. सरनने १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले, तर बुमराहने त्याला योग्य साथ देताना ३ फलंदाजांना माघारी परतवले. मनदीपने टी-२० क्रिकेटमध्ये प्रथमच अर्धशतक झळकाविले. हे युवा खेळाडू पुन्हा एकदा कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहेत. (वृत्तसंस्था)भारताने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच १० गडी राखून विजय मिळविला आहे. या विजयामुळे पाहुण्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावण्यास मदत झाली असेल. गेल्या लढतीत मोठा विजय मिळविला असला, तरी अनुभवी धोनी झिम्बाब्वेला कमी लेखण्याची चूक करणार नाही. धोनीने संघ सहकाऱ्यांना आत्ममश्गूल न राहण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी विजयानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमध्ये वेगाने धाव पळण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षकांवर दडपण येते.’झिम्बाब्वेबाबत विचार करता ग्रीमी क्रेमरच्या नेतृत्वाखालील संघ मालिकेचा सकारात्मक शेवट करण्यास प्रयत्नशील आहे. नियमित अंतरात विकेट गमाविल्याचा संघाला फटका बसला असल्याची कबुली क्रेमरने सोमवारी लढतीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली होती. झिम्बाब्वे संघाची भिस्त चामू चिभाभा, हॅमिल्टन मसाकाद््जा, सिकंदर रजा, एल्टन चिगुम्बुरा आणि माल्कम वॉलेर यांच्या फलंदाजीवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजांकडूनही त्यांना चांगल्या कामगिरीची आशा आहे. प्रतिस्पर्धी संघभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), लोकेश राहुल, फैज फजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, ऋषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरन, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट आणि युजवेंद्र चहल.झिम्बाब्वे : ग्रीम क्रेमर (कर्णधार), वुसीमुजी सिबांडा, सिकंदर रजा, एल्टन चिगुम्बुरा, हॅमिल्टन मसाकाद्जा, वेलिंग्टन मसाकाद्जा, तेंडाई चतारा, चामू चिभाभा, डोनाल्ड तिरिपानो, मॅल्कम वॉलेर, पीटर मूर, तापिवा मुफुद्जा, टिनोटेंडा मुतोम्बोद्जी, रिचमंड मुतुम्बामी, तौराई मुजारबानी, ब्रायन चारी, नेविल मादजिवा, तिमीसेन मारुमा.