ऑलिम्पिक आणि डायमंड लीग विजेता गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गुजरातच्या वडोदरा येथे नवरात्रोत्सवात सहभाग घेतला. यावेळी नीरजने गरबाही खेळला. ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नीरज गुजरातला गेला आहे आणि नवरात्रीच्या सणाचा आनंद साजरा करण्याचा मोह त्यालाही आवरता आला नाही. त्याला पाहण्यासाठी तरुण-तरुणींची गर्दी उसळली होती. नीरज येथील गरबा महोत्सवात पारंपरिक कपडे परिधान करून पोहोचला. त्याची एन्ट्री होताच उपस्थितांनी त्याच्या नावाचा गजर केला. काही लोकांनी खास गुजराती भाषेत ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો असे म्हटले. ( गरम गरम सीरो ( हलवा), नीरज भाई हीरो).
नीरजची 'सुवर्ण' कामगिरी
- जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा - सुवर्णपदक
- आशियाई स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक
- राष्ट्रकुल स्पर्धा - सुवर्णपदक
- टोकियो ऑलिम्पिक २०२० - सुवर्णपदक
- जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा २०२२ - रौप्यपदक