आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धा : भारताच्या खेळाडूंनी पटकावली तीन पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:31 PM2019-12-03T16:31:32+5:302019-12-03T16:33:25+5:30
भारताचे झहीर पाशा, अनिल मुंडे, के. श्रीनिवास ठरले पदकांचे मानकरी
भारतीय आर्युविमा महामंडळ व ओ एन जी सी पुरस्कृत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या यजमान पदाखाली आयोजित करण्यात आलेल्या आठवा आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धेच्या ‘स्विज लीग’ पद्धतीच्या एकेरी गटात जहीर पाशा, अनिल मुंडे (भारत), के. श्रीनिवास (भारत) यांनी १६, १४, १४ असे गुण मिळवून सुवर्ण, रजत, कांस्य पदकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेला सोळा देशांतून शंभर खेळाडू आणि अधिकारी यांचा उस्फुर्त सहभाग लाभला आहे.
‘स्विज लीग’च्या आठव्या फेरीमध्ये भारताच्या जहीर पाशाने अत्यंत आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या इर्शाद एहमदचे २५-१० असा संघर्षपूर्ण विजय मिळवीत सुवर्ण पदक पटकावले. झहीर पाशाने आतापर्यंत पाच ब्रेक टू फिनीश नोंदविले आहे. भारताच्या अनिल मुंडेने सहज बांग्लादेशच्या रहमान हाफिजूरच्या २५-०८ असा पराभव करून वर्चस्व सिद्ध करत रजत पदक पटकाविले. भारताच्या के. श्रीनिवास ने २५-० असा विजय मिळवीत भारताच्या संदीप दिवेचा फडशा पाडून कांस्य पदक पटकावले.
आठव्या फेरीच्या सामन्यात भारताच्या रश्मी कुमारीने श्रीलंकेच्या दुलक्षने दिनेतचा २५-१३ असा विजय मिळवीत १२ वा क्रमांक पटकाविला. श्रीलंकेच्या माजी विश्व विजेता निशांत फर्नांडोने यु.एस.ए. च्या मल्लीशेट्टी सॅम चा २५-१३ मात करत नववे क्रमांक पटकाविले. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताच्या राजेश गोईलने भारताच्या आएशा मोहंमदचा २५-०५ असा पराभव केला. भारताच्या काजल कुमारीने भारताच्याच अभिजीत त्रीपणकरचा २५-१५ असा पराभव करून पाचवे क्रमांक पटकाविले. या स्पर्धेत आत्तापर्यंत नऊ ब्रेक टू फिनीश आणि पाच ब्लॅक टू फिनीश ची नोंद झालेली आहे.
महत्वपूर्ण निकाल
स्विस लीग - प्रथम फेरी
झहीर पाशा (भारत) वि. वि. इर्शाद एहमद (भारत)- २५-१०
अनिल मुंडे (भारत) वि. वि. रहमान हाफिजूर (बांग्लादेश)- २५-०८
के. श्रीनिवास (भारत) वि. वि. संदीप दिवे (भारत)- २५-०
काजल कुमारी (भारत) वि. वि. अभिजित त्रिपणकर- २५-१५
प्रशांत मोरे (भारत) वि. वि. महंमद अहमद मुल्ला (बांग्लादेश)- २५-०३
राजेश गोईल (भारत) वि. वि. आएशा मोहंमद (भारत)- २५-०५
निशांत फर्नांडो (श्रीलंका) वि. वि. मल्लीशेट्टी सॅम (यु.एस.ए)- २५-०८
रश्मि कुमारी (भारत) वि. वि. दुलक्षणा दिनेत (श्रीलंका)- २५-१३