आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धा : भारताच्या झहीर, निशांत, पीटर, संदीप यांची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:42 PM2019-12-02T17:42:11+5:302019-12-02T17:43:10+5:30
आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धेच्या ‘स्विस लीग’ पद्धतीच्या एकेरी गटात जहीर पाशा, संदीप दिवे (भारत), पीटर भोकर (जर्मनी), निशांत फर्नांडो (श्रीलंका) यांनी प्रथम फेरीमध्ये चमकदार सहज विजय मिळवीत आगेकूच केली. या स्पर्धेला सोळा देशांतून शंभर खेळाडू आणि अधिकारी यांचा उस्फुर्त सहभाग लाभला आहे.
भारतीय आर्युविमा महामंडळ व ओ एन जी सी पुरस्कृत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या यजमान पदाखाली आयोजित करण्यात आलेल्या आठवा आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धेच्या ‘स्विस लीग’ पद्धतीच्या एकेरी गटात जहीर पाशा, संदीप दिवे (भारत), पीटर भोकर (जर्मनी), निशांत फर्नांडो (श्रीलंका) यांनी प्रथम फेरीमध्ये चमकदार सहज विजय मिळवीत आगेकूच केली. या स्पर्धेला सोळा देशांतून शंभर खेळाडू आणि अधिकारी यांचा उस्फुर्त सहभाग लाभला आहे.
‘स्विस लीग’ पद्धतीच्या प्रथम फेरीत भारताच्या प्रशांत मोरे याने यू. एस. ए. च्या अजय अरोरा वर विजय मिळविताना २५-१७ अशी झुंझ द्यावी लागली. या सामन्यात सहाव्या बोर्डमध्ये अजय अरोरा ने स्पर्धेतील पहिली ब्रेक टू फिनीश ची नोंद केली. भारताच्या संदीप दिवे ने एकतर्फी झालेल्या सामन्यात मालदिवच्या अजमीन इस्माईल चा २५-० ने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेतील दूसरी ब्रेक टू फिनीश नोंद करून मात केली. भारताच्या जहीर पाशा ने एकतर्फी रंगलेला सामना मालदिवच्या आदील आदम चा २५-७ असा पराभव करताना ब्रेक टू फिनीशची नोंद केली.
फ्रान्सच्या डूबियोस पीयरे ने एकतर्फी झालेल्या सामनयात भारताच्या गीता देवीचा २५-४ पराभव करून आगेकूच केली. भारताची विश्वविजेती एस. अपूर्वा ने कॅनडाच्या डंगोई रूपकि‘श्नावर २५-१ असा विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
महत्वपूर्ण निकाल
स्विस लीग - प्रथम फेरी
के. श्रीनिवास (भारत) वि. वि. अबु बाकर मोहंमद युनुस (मलेशिया)- २५-०
जहीर पाशा (भारत) वि. वि. आदील आदम (मालदिवस)- २५-७
निशांत फर्नांडो (श्रीलंका) वि. वि. इर्शाद एहमद (भारत)- २५-१२
रश्मि कुमारी (भारत) वि. वि. अलि नाहर (यु.ए.ई)- २५-०
प्रशांत मोरे (भारत) वि. वि. अजय अरोरा (यु.एस.ए)- २५-१७
रहमान हाफिजूर (बांग्लादेश) वि. वि. आजम खान मोहंमद (यु.ए.इ)- २५-१
काजल कुमारी (भारत) वि. वि. चदनी रैमा (बांग्लादेश)- २५-०
शहिद इलमी (श्रीलंका) वि. वि. अहमद अनास (श्रीलंका)- २५-०
महंमद अहमद मुल्ला (बांग्लादेश) वि. वि. रेबेका दलराईन (श्रीलंका)- २५-५
एस. अपूर्वा (भारत) वि. वि. डंगोई रूपकि‘श्ना (कॅनडा)- २५-१
डूबियोस पीयरे (फ्रान्स) वि. वि. गीतादेवी (भारत)- २५-४
संदीप दिवे (भारत) वि. वि. अजमीन इस्माईल (मालदीव)- २५-०
राजेश गोईल (भारत) वि. वि. कैसर सलाउद्दीन (बांग्लादेश)- २५-८
इस्माईल अब्दुल मुतालिब (मलेशिया) वि. वि. नजरूल इस्लाम (यू.के)- २५-७
पीटर बोकर (जर्मन) वि. वि. मकसूदा शूमसाने नहार (बांग्लादेश)- २५-१