आयओए निवडणूक : अध्यक्षपदासाठी ३ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:39 AM2017-11-29T01:39:04+5:302017-11-29T01:39:14+5:30
भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए) १४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करताच चुरस वाढली आहे.
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए) १४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करताच चुरस वाढली आहे. दरम्यान, महासचिवपदासाठी राजीव मेहता यांच्याव्यतिरिक्त कुणीही नामांकन दाखल केले नसल्याने त्यांची फेरनिवड निश्चित झाली.
नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ संपताच निर्वाचन अधिकारी एस. के. मेंदीरत्ता यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. आंतरराष्टÑीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, आयओएत सध्या कोषाध्यक्ष असलेले अनिल खन्ना आणि उपाध्यक्ष वीरेंद्र प्रसाद वैश्य यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरले.
बत्रा यांनी २६ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी चार सेट दाखल केले होते. त्यांच्या अर्जावर मेहता यांनी सूचक, तर कोषाध्यक्ष खन्ना यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. पण आज अखेरच्या क्षणी खन्ना यांनी याच पदासाठी अर्ज दाखल करीत अनेकांना धक्का दिला. वैश्य यांनीदेखील अखेरच्या क्षणी अर्ज दाखल केला आहे. या दोघांनी वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठीही अर्ज दाखल केले असल्याने दोघे उमेदवारी मागे घेतील, असे मानले जाते.
उपाध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी नानावटी, वैश्य आणि जनार्दन गहलोत, सुधांशु मित्तल, देवेंद्रनाथ सारंगी, तरलोचनसिंग, एस, एम. बाली, परमिंदर ढिंढसा, के. गोविंदराज, करण चौटाला, मालवा श्रॉफ, आदिल सुमारीवाला, सुनयना कुमारी, दुष्यंत चौटाला, कुलदीप वैश्य, आशुतोष शर्मा, हिमांता बिस्वा सरमा, विराज सागर दास, आणि अनिल जैन यांचे अर्ज आहेत. कोषाध्यक्षपदासाठी राकेश गुप्ता, मुकेश कुमार आणि आनंदेश्वर पांडे यांचे अर्ज आहेत.
संयुक्त सचिवपदाच्या सहा जागांसाठी ओंकारसिंग, राकेश गुप्ता, नामदेव शिरगावकर, एस. एम. बाली, विक्रम सिसोदिया, कुलदीप वत्स, मुकेश कुमार, राजा के. एस. सिद्धू, डी. व्ही. सीतारामराव व रामअवतारसिंग जाखड रिंगणात आहेत. याशिवाय कार्यकारी सदस्यांच्या दहा जागांसाठी २६ अर्ज आले आहेत. ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. (वृत्तसंस्था)