ऑनलाइन लोकमत
किंगस्टन, दि. 5 - पाकिस्तान विरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्फोटक फलंदाजी करुन अष्टपैलू हार्दिक पांड्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, रविंद्र जडेजासोबत चोरटी धाव घेताना दोघांचा ताळमेळ चुकला आणि पांड्या बाद झाला त्यासोबत भारताच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. त्यानंतर पराभवामुळे आधीच चिडलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून जडेजावर रोष व्यक्त केला होता. जडेजाची खिल्ली उडवणारे अनेक जोक्स व्हायरल झाले. अखेर त्या घटनेबाबत स्वतः हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे.
धावबाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाचा राग आला होता पण तो केवळ फक्त तीनच मिनिटं, असं भारताचा वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्यानं म्हटलं आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध होणा-या पाचव्या सामन्यापूर्वी तो बोलत होता. धावबाद झाल्यानंतर मैदानावर दिसलेली आलेली माझी प्रतिक्रिया म्हणजे केवळ संताप होता. मी असाच आहे, मला पटकन राग येतो पण थोड्याच वेळात ते विसरून मी हसायला लागतो. त्या दिवशीही तेच झालं, बाद झाल्यावर मी ड्रेसींग रूममध्ये गेलो तेव्हा मी खूप उदास होतो, पण थोड्याच वेळात मी हसायला लागलो. त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेले इतरही माझ्याकडे रोखून बघत होते पण माझ्या प्रतिक्रियेमुळे तेही हसायला लागले. कारण खरंच बाद झाल्यावर माझी प्रतिक्रिया विचित्रच होती. तो राग केवळ तीन मिनिटांसाठीच होता. हे सर्व खेळाचा एक भाग असतं आणि खेळाडूला हे सर्व विसरून पुढे जायला लागतं. अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात एका बाजूला फलंदाज बाद होत असताना पांड्याने स्फोटक फलंदाजी करुन भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र जडेजा आणि पांड्याचा परस्परांतील ताळमेळ चुकल्याने पांड्या धावबाद झाला होता. त्यावेळी 46 बॉलमध्ये 76 धावांवर पांड्या खेळत होता.
या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारतावर 180 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या सोबतच त्यांनी चॅम्पियन्सचा चषकही आपल्या नावे केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावरही बरीच टीका झाली होती.
तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली असती- गिलख्रिस्ट
मुर्दाड खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन विराट कोहलीने काही चूक केले नाही; परंतु आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसारख्या मोठ्या लढतीत प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य पर्याय असतो, असे सांगितले. मोठ्या फायलनमध्ये आॅस्ट्रेलियाचा आधीचा संघ असता तर त्यांनी प्रथम फलंदाजी करणे पसंत केल असते. मोठी धावसंख्या रचून प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकण्याकडे आॅस्ट्रेलियाचा कल असता. तथापि, भारताने जास्त सामने ही लक्ष्याचा पाठलाग करून जिंकले आहेत. त्यामुळे विराटच्या निर्णयावर तुम्ही टीका करू शकत नाही. फखरचा उडालेला झेल नोबॉल चेंडूवर उडाला नसता तर वेगळे चित्र असते, असे गिलख्रिस्ट म्हणाला.