Paralympic 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सोमवारचा दिवस गाजवला. भारतीय खेळाडूंनी आज चार पदकांची कमाई केली. नेमबाज अवनी लेखरा हिनं सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास घडवला, तर गोळाफेकीत योगेश काथूनिया व भालाफेकीत देवेंद्र झाझरिया यांनी रौप्यपदक जिंकले. भालाफेकीत सुंदर सिंग गुर्जर यानं कांस्यपदक पटकावले. त्यामुळे भारताची पदकसंख्या ७ अशी झाली आहे. खरं तर ही ८ अशी झाली असती, परंतु थाळीफेकपटू विनोद कुमार यांचे पदक काढून घेण्यात आले आहे. रविवारी विनोद कुमार यांनी थाळीफेकीत F52 गटात कांस्यपदक जिंकले होते, परंतु या कॅटगरीसाठीच्या नियमात ते मोडत नसल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धींनी नोंदवला. तपासाअंती त्यांच्याकडून हे पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीनं घेतला. ( Vinod Kumar has lost his bronze medal in the Men's discus throw F52 after being unable to allocate him a competing category after review. His performance in the competition has been declared void.
Paralympic 2020 : भारतानं जिंकलेलं पदक गमावलं, विनोद कुमार यांच्याकडून कांस्यपदक काढून घेतलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 3:32 PM