खो-खो : ठाणे आणि पुणे यांच्यात होणार रंगतदार लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:56 PM2019-09-27T23:56:12+5:302019-09-27T23:56:44+5:30
उपउपांत्य सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगराचा १६-१४ असा पराभव केला.
धुळे : खो-खोची पंढरी अशी ओळख असलेल्या धुळे येथील गरुड मैदानात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ३६ वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०१९-२० आयोजित केली असून ही स्पर्धा २२ सप्टेंबर पर्यंत खेळली जाणार आहे. या स्पर्धेत उस्मानाबाद व पुण्याचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहचले असून किशोरांमध्ये उस्मानाबाद वि. सांगली व ठाणे वि. पुणे तर किशोरींमध्ये सोलापूर वि. पुणे व उस्मानाबाद वि. नाशिक उपांत्य फेरीत झुंजणार आहेत.
आज सकाळच्या सत्रात उपउपांत्य सामन्यात उस्मानाबादने ठाण्याचा १५-१३ (८-८, ७-५) असा दीड मि. राखून दोन गुणांनी विजय साजरा केला. उस्मानाबादच्या निशा वसावे (१:२०, १:२०मि. संरक्षण व ३ बळी), अश्विनी शिंदे (२:५०मि. संरक्षण व १ बळी), सुहानी धोत्रे (१:१० मि. संरक्षण व ७ बळी) तर ठाण्याच्या दिव्या गायकवाड (२:३० मि. संरक्षण), प्रीती हलगरे (१:४०मि. संरक्षण व ४ बळी), रितिका जांगिड (१:०० १:३० मि. संरक्षण व २ बळी) यांनी जोरदार लढत दिली.
सोलापूरने सातार्याचा १०-६ (१०-४ , ०-२) असा एक डाव ४ गुणांनी धुव्वा उडवला. सोलापूरच्या प्रणाली काळेने दुयासर्या डावात ४:०० मि. संरक्षण करत एक बळी मिळवला व सामनाच एकतर्फी करून सामना एकतर्फी केला. त्यांच्याच शिवाली येडावकरने १:४०, २:०० मि. संरक्षण करत तीन खेळाडू बाद करून मोलाची साथ दिली. सानिका मुंगूसकरने १:५० मि. संरक्षण करत एक बळी मिळवत आरामात विजय संपादन केला. तर सातार्याच्या तन्वी सावंत २:०० मि. संरक्षण केले तर आकांक्षा पवारने ४ खेळाडू बाद करत जोरदार लढत दिली.
नाशिकाने सांगलीचा अतिशय चुरशीच्या सामन्यात १३-१२ (७-५, ५-८) असा अटीतटीच्या सामन्यात व मध्यंतराला दोन गुणांनी पिछाडीवर असून सुद्धा विजयश्री खेचून आणली. त्यात नाशिकच्या ललिता गोबाले (२:१०, २:५० मि. संरक्षण व ३ बळी) ज्योती मेढे (१:१०, १:५० मि. संरक्षण व १ बळी) व सोनाली पवार (१:५० मि. संरक्षण व २ बळी) तर सांगलीच्या सानिका निकम (२:४०, १:१० मि. संरक्षण व ५ बळी, सानिका चाफे (१:५०, १:४० मि. संरक्षण) यांनी खेळात रंगत कायम ठेवली होती.
आणखी एका उपउपांत्य सामन्यात पुण्याने बीडचा १४-४ असा तब्बल एक डाव १० गुणांनी धुव्वा उडवला. पुण्याच्या प्रांजली शेंडगे (३:४० मि. संरक्षण व १ बळी), दीपली राठोड (२:२० मि. संरक्षण व ३ बळी) भाग्यश्री बडे (नाबाद ३:०० मि. संरक्षण व ५ बळी) व प्रेरणा कांबळे (२:२० मि. संरक्षण व १ बळी) तर बीडच्या छाया घाडगे एकतर्फी लढत दिली.
किशोरांच्या उपउपांत्य सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगराचा १६-१४ असा साडेचार मि. राखून दोन गुणांनी पराभव केला. ठाण्याच्या वैभव मोरे (२:१०, १:४० मि. संरक्षण व ५ गडी), मयूरेश मोरे (१:२०, १:२० मि. संरक्षण व २ गडी), ऋषिकेश चोरगे (३ गडी) तर मुंबई उपनगरच्या रामचंद्र झोरे (१:५०, १:१० मि. संरक्षण व २ गडी), सचिन पटेल (१:२० मि. संरक्षण व ३ गडी) व मयूरेश जाधव (४ गडी) यांनी सामन्यात रंगत आणली होती.
उस्मानाबादने नाशिकचा १७-१५ (११-५, ६-१०) असा अडीच मि. राखून दोन गुणांनी पराभव केला. उस्मानाबादच्या रमेश वसावे (१:२०, २:०० मि. संरक्षण व ६ गडी), श्रीशंभो पेठे (२:२०, १:०० मि. संरक्षण व २ गडी), नागेश वसावे (५ गडी) तर पराभूत नाशिकच्या चिंतामण चौधरी (२:५०, १:१० मि. संरक्षण व ५ गडी), कल्पेश सहरे (१:३० मि. संरक्षण व २ गडी) यांनी चांगला खेळ केला.
पुण्याने औरंगाबादचा १४-८ असा एक डाव सहा गुणांनी सहज विजय संपादन केला. पुण्याच्या रोशन कोळीने (२:५०, मि. संरक्षण व २ गडी), ओंकार थोरात (२:२०, १:५० मि. संरक्षण), भावेश माशेरे (नाबाद १:५०, १:३० मि. संरक्षण) तर औरंगाबादच्या रोहित चौधरी (१:४०, मि. संरक्षण व २ गडी) व राहुल सूर्यवंशी यांचा खेळ चांगला झाला.
शेवटच्या उपउपांत्य सामन्यात सांगलीने सोलापूरवर १४-१२ (९-५, ५-७) असा दोन गुणांनी विजय संपादन केला. सांगलीच्या ओम पाटील (२:००, १:१० मि. संरक्षण व १ गडी), आयुष लाड (१:३०, १:१० मि. संरक्षण व २ गडी), सूरज शिंदे (१:१० मि. संरक्षण व १ गडी) व राज शिंगे (१:१० मि. संरक्षण व ४ गडी) तर सोलापूरच्या कृष्णा बनसोडे (१:४०, २:०० मि. संरक्षण व १ गडी), गणेश बोरकर (१:२० २:१० मि. संरक्षण व १ गडी), सुजीत मेटकरी (१:४० मि. संरक्षण व ४ गडी) यांनी जोरदार खेळाचे प्रदर्शन केले.