खो-खो : उस्मानाबाद व सोलापूर ने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 07:00 PM2018-12-10T19:00:56+5:302018-12-10T19:02:03+5:30

३५ वी किशोर-किशोरी (१४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा..

Kho-Kho: Osmanabad and Solapur have won title | खो-खो : उस्मानाबाद व सोलापूर ने मारली बाजी

खो-खो : उस्मानाबाद व सोलापूर ने मारली बाजी

ठळक मुद्देपुण्याचा विवेक ब्राम्हणे व सोलापूरची प्रिती काळे सर्वोत्कृष्ट खेळाडू

जळगांव : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व जळगांव जिल्हा खो-खोअसोसिएशन द्वारे आयोजित, जळगावच्या छत्रपती शिवाजीमहाराज जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या ३५ व्या किशोर-किशोरी (१४वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा किशोर गटात उस्मानाबाद तर मुलींमधे सोलापूर ने विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुण्याच्या विवेक ब्राम्हणे व सोलापूरच्या प्रिती काळे यांना गौरवण्यात आले.

किशोर विभागात उस्मानाबादने रंगतदार अंतिम सामन्यात पुण्यावर (८-५,७-५) १५-१० अशी ५ गुणांनी बाजी मारली. उस्मानाबादच्या किरण वसावे (१.४० मि, २.४० मि व २ गडी,) रवि वसावे (१.४० मि व ३ गडी) व रमेश वसावे (५ गडी) यांनी विजयश्री खेचून आणली. पुण्याच्या विवेक ब्राम्हणे (१.४० मि व १.२० मि) व आकाश गायकवाड (१.३० मि, १ मि व ४ गडी) यांनी कडवी लढत दिली.

मुलींच्या अंतिम सामन्यात सोलापूरने नाशिकचे कडवे आव्हान (९-५,६-६) १५-११ असे ४ गुणांनी मोडून काढत विजेतेपदावर नाव कोरले.सोलापूरच्या अर्चना व्हनमाने (३ मि व २ गडी), प्रिती काळे (१.५० मि, २ मि व ७ गडी) व पुजा सावंत (२.३० मि) या विजयाच्या शिल्पकार होत्या. नाशिकच्या ललिता गोबाले (३ मि व ४ गडी) व मनिषा पडेर (२ मि)यांचे प्रयत्न तोकडे पडले.

स्पर्धेतील तृतीय क्रमांक किशोर गटात मुंबई उपनगर व मुलींमधे उस्मानाबादने पटकावला.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके खालील प्रमाणे:

सर्वोत्कृष्ट संरक्षक : किरण वसावे (उस्मानाबाद)
सर्वोत्कृष्ट आक्रमक : रवि वसावे (उस्मानाबाद)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू : विवेक ब्राम्हणे (पुणे)

सर्वोत्कृष्ट संरक्षक : अर्चना व्हनमाने (सोलापूर)
सर्वोत्कृष्ट आक्रमक : ललिता गोबाले (नाशिक)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू : प्रिती काळे (सोलापूर)

Web Title: Kho-Kho: Osmanabad and Solapur have won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kho-Khoखो-खो