खो खो : सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 09:32 PM2019-06-06T21:32:38+5:302019-06-06T21:33:01+5:30

कुमार गटांच्या पहिल्या सामन्यात सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब, माहीम या संघाने विजय क्लब, दादर या संघाचा (०९-०४-११-०६) २०-१० असा  दहा गुणाने पराभव केला.

Kho Kho: Saraswati Sports Club in the semi-finals | खो खो : सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत

खो खो : सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत

googlenewsNext

मुंबई खो खो संघटना आयोजित व लायन्स क्लब ऑफ माहीम यांच्या सहकार्याने कुमार मुली गटाची जिल्हा अजिंक्यपद खोखो स्पर्धेत कुमार गटांच्या प्राथमिक फेरीच्या सामन्यात ओम  साईश्वर सेवा मंडळ, लालबाग संघाने वैभव स्पोर्ट्स  क्लब, दादरच्या संघाचा (०५-०२-०२-०४) ०९-०६ असा एक गुण व ५ मिनिटे राखून पराभव केला. मध्यंतराला ओंसाईश्वर कडे ३ गुणांची दमदार आघाडी होती.  ओम साईश्वरतर्फे  देवांग ताम्हणेकर  याने ४:१० , १:२० मिनिटे संरक्षण केले. तर भूपेश गायकवाड याने २:२० ,  २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला तर सुनय गुरव याने १:४० मिनिटे संरक्षण केले व  आक्रमणात एक  गडी बाद केले  वैभवतर्फे जयेश जाधव याने ३:३० , १:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक  गडी बाद करून  चांगली लढत दिली.

आज झालेल्या उपउपांत्य फेरीच्या कुमार गटांच्या पहिल्या सामन्यात सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब, माहीम या संघाने विजय क्लब, दादर या संघाचा (०९-०४-११-०६) २०-१० असा  दहा गुणाने पराभव केला. मध्यंतराला सरस्वती कडे ५ गुणांची दणदणीत आघाडी होती.  सरस्वतींच्या  राहुल जावळे याने नाबाद  १:०० , ०.४० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार गडी बाद केले, करण गारोळे याने २:०० , २:०० मिनिटे संरक्षण केले  व आक्रमणात दोन  गडी बाद केले तर शुभम कांबळे याने  १:३० , १:३० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी बाद केले. विजयतर्फे  सुरज पाल याने १:०० , ०:४०,  १:०० मिनिटे संरक्षण केले  व आक्रमणात  तीन  गडी बाद करत अष्टपैलू खेळ केला. परशुराम कोळी याने २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक  गडी बाद केले  मात्र त्यांना आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.

कुमार गटांच्या  उपउपांत्य फेरीच्या दुसऱ्या  सामन्यात  विद्यार्थी  क्रीडा केंद्र, परळ  या  संघाने अमर हिंद मंडळ , दादर या संघाचा (१२-०३-०५) १२-०८ असा एक डाव व चार गुणाने एकतर्फी पराभव केला.   विद्यार्थीतर्फे  प्रतिक घाणेकर याने २:०० , १:३० नाबाद मिनिटे संरक्षण केले तर आक्रमणात दोन गडी बाद केले. तर निखिल पाडावे याने ३:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी मिळवले, तर जितेश नेवाळकर व सम्यक जाधव यांनी प्रत्येकी २ :३०  मिनिटे संरक्षण केले व  आक्रमणात प्रत्येकी दोन  गडी बाद  केले. तर  अमर हिंद मंडळातर्फे सुशांत वरेकर याने  १:०० मिनिटे संरक्षण करून  आक्रमणात सहा गडी बाद करून  चांगली लढत दिली.

 कुमार गटांच्या  उपउपांत्य फेरीच्या तिसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर , दादर   या  संघाने युवक क्रीडा मंडळ, परळ  संघाचा (११-०३-०४)  ११-०७ असा एक डाव व चार  गुणाने पराभव केला. श्री समर्थच्या संघातर्फे जतीन  गावकर याने  ३:३० मिनिटे  संरक्षण केले तर आक्रमणात दोन गडी बाद केले,  वरद फाटक  याने २ :०० मिनिटे  संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी मिळवले, तर जयेश नेवरेकर   याने  १:०० मिनिटे  संरक्षण करून  आक्रमणात तीन गडी बाद  केले.  युवकतर्फे प्रथमेश भडेकर  याने  २:००  मिनिटे संरक्षण केले व  आक्रमणात दोन  गडी बाद  करून चांगली लढत दिली

आज उशिरा झालेल्या कुमार गटाच्या उपउपांत्य फेरीच्या चौथ्या सामन्यात ओम समर्थ भारत  व्यायाम मंदिर , माहीम  या  संघाने  ओम  साईश्वर सेवा मंडळ, लालबाग या  संघाचा (१२-०४-०६)  १२-१० असा एक डाव व दोन गुणांनी पराभव केला.

Web Title: Kho Kho: Saraswati Sports Club in the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.