राजस्थानच्या रॉयल संघासमोर पंजाबचे किंग्ज पराभूत
By Admin | Published: April 10, 2015 11:25 PM2015-04-10T23:25:31+5:302015-04-10T23:40:48+5:30
राजस्थान रॉयल्सने दिलेले १६२ धावांचे आव्हान पंजाबच्या ११ किंग्जना सर करण्यात अपयश आले आहे.
>
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १० - राजस्थान रॉयल्सने दिलेले १६२ धावांचे आव्हान पंजाबच्या ११ किंग्जना सर करण्यात अपयश आले आहे.
मुरली विजय वगळता एकाही खेळाडूला ३० धावा करता आल्या नाहीत. सलामी वीर म्हणून आलेल्या विरेंद्र सेहवागला भोपळा न फोडताच तंबूत परतावे लागले. तर, मुरली विजयने ३२ चेंडूत चार चौकार व एक षटकार लगावत ३७ धावा केल्या. वृद्धिमान शहा व मॅक्सवेल दोघेही सात धावांवर बाद झाले. दोन चौकार लगावत अक्षर पटेल चांगली फलंदाजी करेल असे प्रेक्षकांना वाटत असतानाच २८ चेंडूत २४ धावांवर सौथीच्या गोलंदाजीवर खेळत असताना तो बाद झाला. तर जॉर्ज बेली २४ धावांवर बाद झाल्यावर आलेल्या मिशेल जॉन्सनही खातं न उघडताच तंबूत परत गेला. इरुनित सिंग व करनवीर सिंग या शेवटच्या फळीतील खेळाडूंवर भिस्त असताना त्यांच्याकडूनही अपेक्षीत कामगिरी होणं कठिण होतं. २६ धावांनी राजस्थान रॉयलने पहिला सामना खिशात घातला असून ३ गडी बाद करणा-या जेम्स फोल्कनरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.