बँगलोर-दिल्लीत ‘नॉक आऊट’ लढत
By admin | Published: May 22, 2016 02:38 AM2016-05-22T02:38:58+5:302016-05-22T02:38:58+5:30
कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघ दिल्ली विरुद्ध आज रविवारी आयपीएलचा अखेरच्या ‘नॉक आऊट’ साखळी सामना खेळणार आहे.
रायपूर : कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघ दिल्ली विरुद्ध आज रविवारी आयपीएलचा अखेरच्या ‘नॉक आऊट’ साखळी सामना खेळणार आहे.
विजयाच्या हॅट्ट्रिकसोबत बॅँगलोर संघ फॉर्ममध्ये आला. कोहलीदेखील कारकीर्दीत सर्वोच्च शिखरावर दिसतो. जहीरच्या नेतृत्वाखालील या संघाची कामगिरी बेभरवशाची राहिली. तरही प्ले आॅफच्या दौडीत संघ कायम राहिला, हे विशेष. १७ एप्रिल रोजी दिल्लीने आरसीबीचा पराभव केला होता. त्यांची फलंदाजी क्वींटन डिकॉक आणि संजू सॅमसन यांच्या सभोवताल फिरत आहे. स्थानिक खेळाडू मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत, तसेच पवन नेगी हे अपयशी ठरले. या चौघांकडून चांगली कामगिरी करून घेण्याचे आव्हान संघाचे मेंटर राहुल द्रविडपुढे असेल.