कर्णधारपदासाठी कोहलीला घाई करू नये - गावसकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 10:54 PM2016-05-11T22:54:47+5:302016-05-11T22:54:47+5:30
महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटच्या कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11- माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत नुकतेच वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटच्या कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केले. त्यांच्या मते, क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटसाठी विराटला वेळ द्यायला हवा. त्याच्याकडे जबाबदारी सोपविण्याची घाई करू नये. त्याला आपल्या भूमिकेसाठी अधिक परिपक्व बनायचे आहे. सध्यातरी तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगले नेतृत्व करीत आहे. याचा अर्थ, त्याच्याकडे सर्व फॉर्मेटची जबाबदारी सोपविणे योग्य वाटत नाही. गावसकर एका चॅनेलशी बोलत होते.
दरम्यान, महेंद्रसिंग धोनी हा २०१९ च्या विश्वचषकापर्यंत भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करू शकणार नाही, त्यामुळे विराट कोहलीला कर्णधार म्हणून पाहायला हरकत नाही, असे सौरव गांगुलीने म्हटले होते. त्यामुळे विराटकडे लवकरच ही जबाबदारी सोपवायला हवी. तो आयपीएलमध्ये सुद्धा जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. तो कर्णधारपदासाठी परिपक्व आहे, असेही गांगुली म्हणाला होता.