नवी दिल्ली : माजी कर्णधार सौरभ गांगुलीने विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत नुकतेच वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटच्या कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केले. त्यांच्या मते, क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटसाठी विराटला वेळ द्यायला हवा. त्याच्याकडे जबाबदारी सोपविण्याची घाई करू नये. त्याला आपल्या भूमिकेसाठी अधिक परिपक्व बनायचे आहे. सध्या तरी तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगले नेतृत्व करीत आहे. याचा अर्थ, त्याच्याकडे सर्व फॉरमॅटची जबाबदारी सोपविणे योग्य वाटत नाही. गावसकर एका चॅनेलशी बोलत होते. दरम्यान, महेंद्रसिंह धोनी हा २०१९ च्या विश्वचषकापर्यंत भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करू शकणार नाही, त्यामुळे विराट कोहलीला कर्णधार म्हणून पाहायला हरकत नाही, असे सौरभ गांगुलीने म्हटले होते. त्यामुळे विराटकडे लवकरच ही जबाबदारी सोपवायला हवी. तो आयपीएलमध्येसुद्धा जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. तो कर्णधारपदासाठी परिपक्व आहे, असेही गांगुली म्हणाला होता.(वृत्तसंस्था)
कर्णधारपदासाठी कोहलीला घाई करू नये
By admin | Published: May 12, 2016 2:50 AM