म्हणून कोहलीला फटकावले होते : प्रशिक्षक शर्मा

By admin | Published: May 27, 2017 12:42 AM2017-05-27T00:42:05+5:302017-05-27T00:42:05+5:30

टीम इंडिया १ जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना झाली. ‘मिनी वर्ल्डकप’ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करीत आहे

Kohli was struck as: Coach Sharma | म्हणून कोहलीला फटकावले होते : प्रशिक्षक शर्मा

म्हणून कोहलीला फटकावले होते : प्रशिक्षक शर्मा

Next

टीम इंडिया १ जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना झाली. ‘मिनी वर्ल्डकप’ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करीत आहे. कोहली हा आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानातील
आक्र मक वृत्तीमुळे अनेकदा कोहलीला टीकाही सहन करावी लागली. याच
आक्र मक स्वभावामुळे कोहलीला बालपणी प्रशिक्षकांचा मारदेखील खावा लागला होता.
कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीच याबद्दलचा खुलासा केला. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांच्या ‘ड्रिव्हन : द विराट कोहली स्टोरी’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते उपस्थित होते. कोहली लहानपणापासूनच खूप हट्टी असल्याचे राजकुमार यांनी सांगितले. सोबतच विराटकडून कधी कोणती चूक झाली तर त्याला राजकुमार यांचा मार देखील खावा लागला .
‘‘विराटला मी केवळ दम देत नसे. कारण केवळ दम दिल्याने तो ऐकायचा नाही. अनेकदा मला त्याला थोबाडीत मारावे लागले आहे.’’, असे राजकुमार म्हणाले.
‘‘कोहली नेहमी मोठ्या खेळाडूंमध्ये जाऊन खेळायचा. त्याच्या वयाचे खेळाडू त्याला बाद करण्यात अपयशी ठरायचे मग कोहलीला कंटाळा यायचा. त्यावेळी कोहली फक्त दहा वर्षांचा होता.’’, असे राजकुमार शर्मा म्हणाले.

मला नाही बॅटिंग मिळाली तर...
कोहली बालपणापासून स्वत:च्या फलंदाजीबाबत खूप दक्ष आहे. प्रतिस्पर्धी संघ कमी धावांवर गारद झाला की विराट सलामीला फलंदाजीसाठी हट्ट करायचा. ‘मला बॅटिंग मिळाली नाही तर मग?’, असा निरागस प्रश्न तो नेहमी विचारायचा.

Web Title: Kohli was struck as: Coach Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.