विजयासाठी कोलकात्याला 161 धावांचे लक्ष
By admin | Published: April 28, 2017 05:54 PM2017-04-28T17:54:30+5:302017-04-28T17:54:30+5:30
संजू सॅमसन आणि श्रेअस अय्यर यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात सहा बाद 160 धावा केल्या
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 28 - गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या कोलकात्याने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलदांजीचा निर्णय घेतला. गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्लीने फलंदाजी करताना आज सावध सुरुवात केली. शेवटच्या पाच षटकात धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दिल्लीने झटपट विकेट गमावल्या. संजू सॅमसन आणि श्रेअस अय्यर यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात सहा बाद 160 धावा केल्या. संजू सॅमसनने 38 चेंडूत तीन षटकार आणि सहा चौकाराच्चा मदतीने 60 धावा केल्या. करुण नायर आणि संजूने पहिल्या विकेट साठी 4.5 षटकात 48 धावांची सलामी दिली. करुण नायर बाद झाल्यनंतर श्रेअस अय्यरने संजू सॅमसनला सुरेख साथ देताना धावगती वाढवली. श्रेअस अय्यरने 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली, या खेळीदरम्यान त्याने 1 षटकार आणि चार चौकार लगावले. पंथ, अँडरसन, मॉरीस हे आज पुन्हा एकदा अपयशी ठरले. शेवटच्या पाच षटकात दिल्लीकरांना फक्त 30 धावा करता आल्या. हाणामारीच्या षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे दिल्लीची धावसंख्या मर्यादित राहिली. कोलकात्याकडून कुल्टर नाइलने 3 बळी मिळवले.