ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ६ : सनरायझर्स हैदराबादनं विजयरथावर असलेल्या गुजरात लायन्सला पराभवाची धूळ चारली आहे. सनरायझर्स हैदराबादनं गुजरात लायन्सनं दिलेलं 126 धावांचा पाठलाग करताना निर्धारित 19 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केलं.
कॅप्टन वॉर्नरनं फलंदाजीच्या जोरावर 17 चेंडूंत 1 चौकार आणि 2 षटकार लगावत 24 धावा काढून चांगली सुरुवात करून दिली. विल्यमसन 6, हेनरिक 14, युवराज सिंग 5, हूडा 18 धावा काढून तंबूत परतले आहेत. धवननं नाबाद खेळी करत 40 चेंडूंत 6 चौकार खेचत 47 धावा केल्या आहेत. ओझानं नाबाद राहत 6 चेंडूंत 1 चौकार मारत 9 धावा काढल्या. धवन आणि ओझाच्या जोडीनं सनरायझर्स हैदराबादला विजय मिळवून देण्यात हातभार लावला आहे.
गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर हैदराबाद सनराजसर्स संघाने गुसराज लायन्स संघाला २० षटकात १२६ धावांवर रोखले होतं. भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजुर, नेहरा यांच्या धारधार गोलंदाजीपुढे गुजरातची तगडी फलंदाजी ढासळली. स्मिथ, रैना, मॅक्युलम, ब्राव्हो, जाडेजासारखे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. मोक्याच्या क्षणी अॅरोन फिंचने संयमी फलंदाजी करताना ४२ चेंडूत ५२ धावा केल्या. फिंचच्या खेळीच्या जोरावर गुजरातने १०० धावांचा आकडा पार केला. स्मिथ १, रैना२०, मॅक्युलम ७, ब्राव्हो१८, कार्तिक ०, जाडेजा १८ धावांची खेळी केली. हैदराबाद कडून अंतिम ११ मध्ये अनुभवी युवराज सिंगला स्थान देण्यात आलेय.