महाराष्ट्र केसरी 2020 : माती विभागात आबासाहेब आटकळेने जिंकले सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 12:56 PM2020-01-04T12:56:44+5:302020-01-04T12:58:28+5:30
Maharashtra Kesari 2020 Result : ७९ किलो माती विभागात हणमंत पुरीची सुवर्ण कामगिरी
पुणे : महाराष्ट्र केसरीकुस्ती स्पर्धेतील लढतीना काल दिनांक ३ जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. काल सकाळ व संध्याकाळच्या दोन सत्रात ५७ व ७९ किलो वजनी गटातील एकूण पाच फेऱ्या झाल्या. तर माती विभाग मधील अंतिम लढती झाल्या असून गादी विभागाच्या दोन गटातील लढती आज सकाळच्या सत्रात होतील.
५७ किलो वजनी गटातील थरारक लढतीत आबासाहेब अटकळेची बाजी
५७ किलो वजनी गटात माती विभागात आबासाहेब अटकळे याने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम फेरीसाठी आबासाहेब अटकळे व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये रंगतदार लढत झाली. सहा मिनिटाच्या लढतीत दोघांचे ही ८-८ असे बरोबरीत गुण झाले होते. पण आबासाहेब यांनी शेवटचा गुण मिळविल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
७९ किलो माती विभागात हणमंत पुरीची सुवर्ण कामगिरी
चार कुस्त्या करून अंतिम फेरीत धडक मारलेल्या पैलवाम हणमंत पुरी (उस्मानाबाद) व पैलवान सागर चौगुले (सोलापूर जिल्हा ) यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सागर वरती ५ विरुद्ध ० अशा गुण फरकाने विजय मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर कांस्य पदकाच्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदे याने परभणीच्या गिरिधारी दुबे यावर ८-२ अशी मात केली.
७९ किलो गादी विभागाच्या उपांत्य लढतीत रामचंद्र कांबळे (सोलापूर) याने कोल्हापूर शहराच्या निलेश पवार वर १३ विरुद्ध ४ गुणांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या रवींद्र खरे याने श्रीधर मुळे (सातारा) याच्यावर ४ विरुद्ध १ अशा गुण फरकाने मात देत अंतिम फेरी गाठली. उद्या, ४ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात रामचंद्र कांबळे विरुद्ध रवींद्र खरे यांची गादीवरील लढत होणार आहे. तर ५७ किलो गटात जोतीबा अडकळे याने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
गादी विभागातील ७९ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या रामचंद्र कांबळे याने उस्मानाबादच्या रविंद्र खैरे याचा १४-३ गुणाधिक्याने पराभव करून सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली, तर रविंद्र खैरेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
*७९ किलो अंतिम निकाल*
१) रामचंद्र कांबळे (सोलापूर)
२) रविंद्र खैरे (उस्मानाबाद)
३) केवल भिंगारे (अहमदनगर)
३) श्रीधर मुळीक (सातारा)
गादी विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे याने कोल्हापूरच्या रमेश इंगवले याला चारीमुंड्या चितपट करून सुवर्ण पदक पटकाविले, तर रमेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तर पुणे शहरातील संकेत ठाकुर याने तिसर्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर शहराच्या साईराज चौगुले याचा १०-० आशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्य पदक जिंकले.
*५७ किलो अंतिम निकाल*
१)ज्योतिबा अटकळे (सोलापूर जिल्हा)
२) रमेश इंगवले (कोल्हापूर जिल्हा)
३)संकेत ठाकुर (पुणे शहर)
३) अतिष तोडकर (बीड)
■ ७९ किलो (माती विभाग)
🥇सुवर्ण – हणमंत पुरी (उस्मानाबाद)
🥈रौप्य – सागर चौगुले (सोलापूर जिल्हा )
🥉कांस्य – धर्मा शिंदे (नाशिक)
■ ५७ किलो (माती विभाग)
🥇सुवर्ण – आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा)
🥈रौप्य – संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर)
🥉कांस्य – ओंकार लाड (नाशिक)