महात्मा गांधी संघासह विहंगची आगेकूच
By admin | Published: May 21, 2016 05:01 AM2016-05-21T05:01:20+5:302016-05-21T05:01:20+5:30
विहंग स्पोटर््स क्लब या संघांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारुन अखिल भारतीय निमंत्रित खो-खो स्पर्धेच्या पुरुष गटात उपांत्य फेरी गाठली.
मुंबई : बलाढ्य महात्मा गांधी स्पोटर््स अॅकेडमी व विहंग स्पोटर््स क्लब या संघांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारुन अखिल भारतीय निमंत्रित खो-खो स्पर्धेच्या पुरुष गटात उपांत्य फेरी गाठली.
महात्मा गांधी संघाने सांगलीच्या हिंदकेसरी स्पोटर््सचे आव्हान २१-१९ असे परतावले. मध्यंतराला सामना ८-८ असा बरोबरी राहिल्यानंतर दुसऱ्या डावात महात्मा गांधी संघाने वेगवान खेळ करत १३-११ अशा आघाडीसह बाजी मारली. दीपक माधवचा अष्टपैलू खेळ महात्मा गांधी संघाच्या विजयात निर्णायक ठरला. हिंदकेसरीच्या मिलिंद चावरेकर व उत्तम सावंत
यांचा अष्टपैलू खेळ अपयशी ठरला.
विहंग स्पोटर््स क्लबने दणदणीत आगेकूच करताना कर्नाटकच्या श्री एम. व्ही. स्पोटर््स संघाचा ११-१० असा एक डाव व एका गुणाने धुव्वा उडवला. मध्यांतराला विहंगने ६ गुणांनी आघाडी राखून एमव्ही संघावर फॉलोआॅन लादला. यानंतर विहंगने आक्रमक खेळ करत एमव्ही संघाचे आव्हान संपुष्टात आणले.