शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

मुंबई वि. बडोदा लढत अनिर्णित

By admin | Published: October 17, 2016 3:43 AM

गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या ‘अ’ गटात बडोद्याविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सामन्यात ३ गुणांची कमाई केली.

नवी दिल्ली : पहिल्या डावात घेतलेल्या निर्णायक आघाडीच्या जोरावर गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या ‘अ’ गटात बडोद्याविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सामन्यात ३ गुणांची कमाई केली. यासह मुंबईने ९ गुणांसह गटात अग्रस्थान पटकावले आहे. दिल्ली येथील मॉडेल क्रीडा संकुलात झालेल्य या सामन्यात बडोद्याने पहिल्या डावात ३०५ धावांची मजल मारल्यानंतर दुसरा डाव ३८३ धावांवर घोषित करुन मुंबईला विजयासाठी ३६६ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकरांनी चौथ्या दिवसअखेर ७७ षटकात ५ बाद २२४ धावांची मजल मारली. मुंबईने पहिल्या डावात ३२३ धावा काढून १८ धावांची माफक परंतु निर्णायक आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवसअखेर बडोद्याने ५ बाद ३२१ धावांची मजल मारली होती. दीपक हूडाने चौथ्या व अंतिम दिवशी वैयक्तिक ६६ धावांवरुन खेळताना १०३ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद १०० धावा काढल्या. हूडाच्या शतकानंतर कर्णधार इरफान पठाणने लगेच डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.३६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने अंतिम दिवशी ७७ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २२४ धावांची मजल मारली. कर्णधार आदित्य तरेने सर्वाधिक नाबाद ६३ धावांची खेळी करत १६२ चेंडूत ९ चौकार मारले. पहिल्या डावातील शतकवीर अखिल हेरवाडकर यावेळी २० धावा काढून परतला. परंतु, त्याने जय बिस्तासह (४९) अर्धशतकी सलामी देत मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली होती.श्रेयश अय्यर ५४ धावांत ४६ धावा काढून परतला. बडोद्याकडून युसुफ पठाण व मुर्तुझ वहोरा यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मुंबईकर अखिल हेरवाडकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक :बडोदा (पहिला डाव) : ८६.१ षटकात सर्वबाद ३०५ धावा.मुंबई (पहिला डाव) : ९२.५ षटकात सर्वबाद ३२३ धावा.बडोदा (दुसरा डाव) : ९४ षटकात ५ बाद ३८३ धावा (घोषित) (केदार देवधर १४५, दीपक हूडा नाबाद १००, आदित्य वाघमोडे ६६; तुषार देशपांडे २/६१)मुंबई (दुसरा डाव) : ७७ षटकात ७ बाद २२४ धावा (आदित्य तरे नाबाद ६३, जय बिस्ता ४९, श्रेयश अय्यर ४६; मुर्तुझा वहोरा २/३२, युसुफ पठाण २/५९)