वसई विरारमध्ये 8 डिसेंबर रोजी राष्ट्रीय मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 07:24 PM2019-12-02T19:24:54+5:302019-12-02T19:25:25+5:30

मॅरेथॉन मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंदी

National Marathon on December 8 in Vasai Virar | वसई विरारमध्ये 8 डिसेंबर रोजी राष्ट्रीय मॅरेथॉन

वसई विरारमध्ये 8 डिसेंबर रोजी राष्ट्रीय मॅरेथॉन

googlenewsNext

पालघर :- वसई विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कलाक्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय महापौर मॅरेथॉन स्पर्धा व इतर शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने  मॅरेथॉन स्पर्धेच्या सर्व मार्गांवर दि. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अधिसूचनेद्वारे कळविले आहे.

स्पर्धेचा मार्ग पुढील प्रमाणे

 

- ४२ कि . मी . ची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा मार्ग हा विरार नविन विवा कॉलेज विरार(प) येथून सुरू होवून - तिरुपतीनगर - जकातनाका विरार पश्चिम - बोळींज नाका - पाटील आळी - उमराळे चर्च - चक्रेश्वर तलाव - हेगडेवार चौक - समेळपाडा , नालासोपारा पूर्व - पश्चिम रेल्वे उड्डाण पूल - आचोळे रोड - सोळंकी मेडीकल – बँक ऑफ इंडीया वसंत नगरी - फायर ब्रिगेड स्टेशन - वसंत नगरी मैदान - वसंतनगरी सर्कल - वसंतनगरी मेनगेट वसई स्टेशन रोड वसई पूर्व पश्चिम रेल्वे उड्डाणपूल - डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक - पंचवटी नाका - अंबाडी रोड – नवघर अंबाडी रोड पोलीस चौकी - वसई माणिकपूर रोड - माणिकपूर नाका , बाभोळा नाका - पापडी नाका तामतलाव नाका - चिमाजी आप्पा मैदान - वसई गाव बस डेपो - जी.जी. कॉलेज मार्ग - व्हीक्टर हाईट्स येथून युटर्न - वसई बस डेपो मार्ग - पारनाका - रमेदी क्रॉस - होळी मार्केट - तरखड - देवतलाव - बंगली नाका - बाभोळा नाका माणिकपूर नाका - अंबाडी रोड - पंचवटी नाका - वसई पूर्व पश्चिम रेल्वे उड्डाणपूल - वसंतनगरी मेनगेट - वसंतनगरी सर्कल - वसंत नगरी मैदान - फायर ब्रिगेड स्टेशन - बैंक ऑफ इंडीया - सोळंकी मेडीकल - आचोळे रोड - नालासोपारा पूर्व पश्चिम रेल्वे उड्डाण पूल - समेळपाडा - हेगडेवार चौक - चक्लेश्वर तलाव - उमराळे चर्च पाटील आळी - बोळींज नाका - गोकूळ टाऊनशिप - जकातनाका , तिरुपती नगर , नविन विवा कॉलेज विरार(प) असा राहील अशी माहिती हि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकसुचनेच्या माध्यमातून दिली.

 

- तसेच, २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉन स्पर्धा मार्ग हा जी.जी. कॉलेज रोड व्हिक्टर हाईटस् बिल्डींग येथे सुरू होवून वसई पंचायत समिती रोड - पारनाका - वसई बस डेपो मार्ग - पारनाका - रमेदी क्रॉस - होळी मार्केट – तरखड- देवतलाव - बंगली नाका - बाभोळा नाका - माणिकपूर नाका - अंबाडी रोड - डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक (पंचवटी नाका ) - वसई पूर्व - पश्चिम रेल्वे उड्डाणपूल - वसंत नगरी मेन गेट - वसंतनगरी सर्कल - वसंत नगरी मैदान - फायर ब्रिगेड स्टेशन - बँक ऑफ इंडीया - सोळंकी मेडीकल - आचोळे रोड - नालासोपारा पूर्व - पश्चिम रेल्वे उड्डाण पूल - समेळपाडा - हेगडेवार चौक - चक्रेश्वर तलाव - उमराळे चर्च - पाटील आळी - बोळींज नाका - गोकूळ टाऊनशिप जकात नाका - तिरुपती नगर - , नविन विवा कॉलेज विरार ( प ) असा राहील .

 

- ११ कि.मी. ची मॅरेथॉन स्पर्धा मार्ग हा नविन विवा कॉलेज येथून सूरु होऊन तिरुपती नगर - जकात नाका - विरार(प.) - बोळींज नाका - पाटील आळी - उमराळे चर्च - चक्रेश्वर तलाव येथून युटर्न - उमराळे चर्च पाटील - बोळींज नाका - जकात नाका - विरार (प.) - तिरुपती नगर - नविन विवा कॉलेज विरार (प) असा राहील .

 

- फॅमिली रन स्पर्धा मार्ग हा नवीन विवा कॉलेज येथे सुरू होवून तिरुपती नगर - जकात नाका - बोळींज नाका (बिकानेर स्विट) - येथून युटर्न उमराळे चर्च - पाटील आळी - बोळींज नाका - गोकूळ टाऊनशिप - तिरुपती नगर - नविन विवा कॉलेज (प.) असा राहील .

- सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही फायरब्रिगेड, रुग्णवाहिका, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, महसूल विभाग, पोलीस विभाग, तालुका दंडाधिकारी, वसई विरार महानगरपालिकेची वाहने, मॅरेथॉन स्पर्धेकरीता दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.

Web Title: National Marathon on December 8 in Vasai Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.