निकहत झरीन हिची उपांत्य फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:49 AM2020-01-23T03:49:11+5:302020-01-23T03:49:38+5:30
गतविजेत्या निकहत झरीनने (५१ किलो) स्ट्रांजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली : गतविजेत्या निकहत झरीनने (५१ किलो) स्ट्रांजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिची प्रतिस्पर्धी सेवडा असेनोवा हिने लढतीतून माघार घेतली. असेवोना हिने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. पुरुष गटात दुर्योधन सिंग नेगी (६९) आणि मोहम्मद हसमुद्दीन (५७) यांनी पहिल्या फेरीत आपापल्या गटातील लढतीत विजय मिळवला आहे.
नेगीने पोलंडच्या मतेऊज पोलस्कीला पराभूत केले तर हसमुद्दीन याने फ्रान्सच्या एंजो ग्राऊला मात दिली. भारताचे सहा बॉक्सर्स पहिल्या फेरीत बाहेर पडले. पुरुषांच्या गटात दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता अंकित खताना (७५ किलो), आशियाई रौप्य पदक विजेता दीपक कुमार (५२ किलो), नरेंदर (९१ किलोपेक्षा जास्त) हे पहिल्या फेरीतच पराभूत झाले.
नुपूर (७५ किलो) आणि ललिता (६९ किलो) महिला गटातून बाहेर पडले आहेत. चारवेळा आशियाई पदक विजेता शिव थापाला दुसऱ्या फेरीत बाय मिळाला. तिचा सामना पोलंडच्या पॉवेल पोलाकोविच हिच्यासोबत होईल. (वृत्तसंस्था)