टोकियो : येथे होणाऱ्या २०२० आॅलिम्पिकसाठी तिकिट विक्री गुरुवारी सुरू झाली असून उद्घाटन सोहळ्याचे सर्वात महागडे तिकीट तीन लाख येनचे (जवळपास एक लाख ९१ हजार रुपये) असेल. जपानच्या स्थानिक नागरिकांना लॉटरी पद्धतीने तिकिटे उपलब्ध करून दिली जातील.आॅलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या ३३ खेळांसाठी वेगवेगळ्या किमतीची तिकिटे राहतील. सर्वात कमी किंमतीचे तिकीट २५०० येनचे (१६०० रुपये) आहे.पुरुष १०० मीटर शर्यतीसाठी जवळपास ८३ हजार डॉलर किमतीचे तिकीट उपलब्ध असेल. या तिकिटांमुळे स्पर्धा अगदी जवळून पाहण्याची संधी मिळेल. उपलब्ध तिकिटांपैकी अर्धी तिकीट जवळपास पाच हजार रुपये किमतीची आहेत. लहान मुलांचे पालक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी १२८७ रुपये किमतीच्या तिकिटांची व्यवस्था आहे. स्थानिक नागरिकांसाठी तिकिटांची किंमत २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमधील किमतीइतकीच, तर रिओ आॅलिम्पिकच्या तुलनेत थोडी महागडी असल्याची माहिती टोकियो आॅलिम्पिकच्या विपणन व्यवस्थापकाने दिली. (वृत्तसंस्था)
ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचे तिकिट ‘फक्त एक लाख ९१ हजार रुपये’!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 4:07 AM