नवी दिल्ली : अस्ताना (कझाकिस्तान) येथे झालेल्या आशियाई पात्रता कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात किरजीस्तान व महिला गटात मंगोलियाची महिला कुस्तीपटू उत्तेजक द्रव्य चाचणी दोषी आढळल्यामुळे भारताच्या रवींद्र खत्री आणि बबीता कुमारी यांना आॅलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. अस्ताना येथे झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या ग्रीकोरोमन प्रकारातील ८५ किलो गटात किरजीस्तानचा केनझीव जहनरदेख हा उत्तेजक द्रव्य चाचणी दोषी आढळल्यामुळे त्याला युनायटेड वर्ल्ड रेस्लिंग महासंघाने बाद केले आहे. जहनरदेख बाद झाल्यामुळे भारताच्या रवींद्र खत्रीला आॅलिम्पिक स्पर्धेत संधी मिळाली आहे. दुसरीकडे महिलांच्या ५३ किलो गटात मंगोलीयाची सुमिया इर्डेननीव्हहिमेघसुद्धा दोषी आढळल्यामुळे भारताच्या बबीता कुमारीला आॅलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. या दोघांची निवड झाल्यामुळे भारताचे एकूण ८ मल्ल आॅलिम्पिकमध्ये सहभागी होतील.(वृत्तसंस्था)
खत्री, बबीता यांना आॅलिम्पिक तिकीट
By admin | Published: May 12, 2016 2:51 AM