टोकियो : ‘ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाच्या करारामध्ये म्हटले आहे की, क्रीडा महाकुंभाचे २०२० सालादरम्यानच आयोजन केले जाऊ शकते,’असे जपानचे ऑलिम्पिक मंत्री यांनी मंगळवारी सांगितले. सीको हाशिमोतो यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, ‘ऑलिम्पिक जर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २४ जुलैला प्रारंभ होऊ शकली नाही, तर ही स्पर्धा याच वर्षी कधीही आयोजित होऊ शकते.’टोकियो ऑलिम्पिकवर झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचा धोका आहे. या व्हायरसमुळे जपानमध्ये आतापर्यंत १२ व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक क्रीडा स्पर्धा व ऑलिम्पिकसोबत जुळलेल्या स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. हाशिमोतो संसदेत म्हणाले की, ‘जर स्पर्धेचे आयोजन २०२० मध्ये शक्य झाले नाही, तर आयओसी स्पर्धा स्थगित करू शकते. स्पर्धा कॅलेंडर वर्षात न झाल्यास स्थगित होऊ शकते.’>स्पर्धा अन्य शहरात?आयओसीचे अधिकारी आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजक सातत्याने सांगत आहेत की, ‘ऑलिम्पिक स्पर्धा निर्धारित कार्यक्रमानुसारच होईल.’ अन्य काहींच्या मते झपाट्याने पसरत असलेल्या व्हायरसमुळे स्पर्धा स्थगित किंवा रद्द केली जाऊ शकते किंवा स्पर्धा अन्य दुसऱ्या शहरात आयोजित केली जाऊ शकते.
कधीही होऊ शकते ऑलिम्पिक, जपानी मंत्र्यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:59 AM